छत्रपती संभाजीनगर : आपणही आपला स्वतःचा काहीतरी व्यवसाय करावा आणि त्या माध्यमातून आपल्या कुटुंबाला हातभार लावावा, असे अनेक महिलांना वाटते. याच विचारातून एका महिलेने स्वतःचा होममेड चॉकलेटचा व्यवसाय सुरू केला आणि त्या आज त्या व्यवसायाच्या माध्यमातून अत्यंत चांगली कमाई करत आहेत. जाणून घेऊयात, त्यांची प्रेरणादायी कहाणी.
छत्रपती संभाजीनगर शहरात राहणाऱ्या उर्मिला देसाई यांची ही कहाणी आहे. त्यांनी बीएपर्यंत शिक्षण घेतलेला आहे. त्यांचा होम सायन्स हा विषय होता. उर्मिला यांनी सुरुवातीला काही दिवस नोकरी केली. पण त्यानंतर त्यांच्यावर कौटुंबिक जबाबदारी आल्या आणि त्यामुळे त्यांना नोकरी सोडावी लागली.
advertisement
मुलगा लहान होता आणि त्यांना घरही सांभाळायचे होते. मुलगा मोठा झाल्यावर आता आपण नुसते घरात बसण्यापेक्षा काहीतरी करावा, असे त्यांनी ठरवलं. त्यांना आधीपासूनच स्वयंपाकाची खूप आवड होती. त्यामुळे त्यांनी स्वयंपाकाचा काहीतरी व्यवसाय सुरू करावा, असा विचार केला. त्यांना आधीपासूनच स्वयंपाकाची आवड होती. म्हणून त्यांनी असं ठरवलं की, आपण यामध्येच वेगळा काहीतरी पदार्थ करून लोकांना देऊयात. म्हणून त्यांनी होममेड चॉकलेटचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्यांनी आपल्या नातेवाईकांना मैत्रिणींना चॉकलेट हे टेस्ट करण्यासाठी दिले आणि तिथून त्यांनी त्यांचा व्यवसाय हा वाढवायला सुरुवात केली.
त्यांनी सुरुवातीला त्यांच्या घराशेजारी एक चॉकलेटचा स्टॉल लावला. त्यावर त्यांनी स्वतः बनविलेले चॉकलेट विकायला ठेवले. त्यांचे चॉकलेट हे लोकांच्या पसंतीला उतरले आणि त्यांना भरपूर अशा चॉकलेटचा ऑर्डर यायला सुरुवात झाली. त्यांचा व्यवसाय चांगला चालू होता आणि त्याच दरम्यान लॉकडाऊन लागले. लॉकडाऊनमध्येही त्यांचा व्यवसाय अजून वाढला. कारण लॉकडाऊनमध्ये सगळे बंद होते आणि लोकांना होममेड अशा गोष्टी हव्या होत्या. त्या त्यांच्या चॉकलेट स्वतःच्या घरीच बनवून द्यायच्या. त्यामुळे त्यांच्या चॉकलेटला मोठी मागणी आली. आता सध्या त्या 8 ते 9 प्रकारच्या वेगवेगळ्या चॉकलेटचे फ्लेवर करून विक्री करतात. त्यासोबतच त्या कस्टमाईझ चॉकलेट देखील बनवून देतात.
नाशिकमधील प्रसिद्ध पाटील वाडा मिसळ, महिन्याला 9 लाखांचे उत्पन्न, इंजीनिअरची अनोखी कहाणी!
विशेष म्हणजे त्यांची एक खासियत अशी आहे की, त्यात चॉकलेटचा बुकेदेखील तयार करून देतात. सध्या या चॉकलेटचा व्यवसाय मधून त्या महिन्याला 30 ते 35 हजार रुपये उत्पन्न कमवतात. विशेष म्हणजे, जेव्हा कुठला सण असेल त्यामध्ये राखी पौर्णिमा,गणपती, आणि दिवाळी या सणांमध्ये त्यांच्या चॉकलेटला मोठी मागणी असते. दिवाळीला त्या साधारणपणे 1 लाख रुपये उत्पन्न कमवतात, असे त्यांनी सांगितले. त्यांचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे.