TRENDING:

Success Story : कधी काळी मोलमजुरी केली, बचत गटाने पालटलं महिलांचं नशीब, महिन्याला 1 लाख कमाई

Last Updated:

कधी मोलमजुरी करून दिवस काढणाऱ्या या महिला आज स्वतःचा बचत गट चालवत आहेत. या बचत गटाच्या माध्यमातून त्या वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्की करून विक्री करतात.

advertisement
‎छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील भडजी गावातील 10 महिलांनी संघर्षातून स्वावलंबनाकडे वाटचाल केली आहे. ‎कधी मोलमजुरी करून दिवस काढणाऱ्या या महिला आज स्वतःचा बचत गट चालवत आहेत. या बचत गटाच्या माध्यमातून त्या वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्की करून विक्री करतात. महिन्यासाठी चांगलं उत्पन्न कमवतात.
advertisement

भडजी गावच्या महिलांनी त्यांचा राणी लक्ष्मीबाई महिला बचत गट 2014 साली सुरू केलेला आहे. या बचत गटामध्ये दहा महिला आहेत. या सुरुवातीला सर्व महिला मोलमजुरी करून त्यांचा उदरनिर्वाह करत होत्या. एकदा रत्ना पुसे आणि शारदा पुसे या दोघीजणी एकदा पंचायत समितीमध्ये एका कामानिमित्त गेल्या होत्या. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना काही महिला दिसल्या. त्या महिला बचत गटाच्या होत्या. या महिलांनी त्यांच्याकडे विचारपूस केली की बचत गट काय असतो, कशा पद्धतीने काम करतो आणि त्यानंतर घरी नंतर यांनी देखील ठरवले की आपण देखील बचत गट करूयात आणि त्यांनी 2014 साली बचत गटाची सुरुवात केली आहे.

advertisement

दहा बाय दहाच्या खोलीत सुरू केला व्यवसाय, आज पोहोचला मॉलपर्यंत, अविनाश यांच्या यशाची कहाणी

बचत गट म्हटले की यामध्ये अनेक महिला बचत करतात पण त्यासोबत छोटे-मोठे उद्योग देखील करतात. यांना देखील उद्योग करायचा होता पण त्यांना वाळवण्याचे पदार्थ किंवा लोणचे किंवा पापड करायचं नव्हतं. पण रत्ना पुसे यांचे पती धनसिंग पुसे यांना आधीपासून चिक्की बनवता येत होती तर त्यांनी या सर्व बचत गटामधील महिलांना चिक्की कशी बनवायची हे सगळं शिकवले, मार्गदर्शन केले.

advertisement

त्यांनी कल्पतरू नावाने स्वतःचा चिक्कीचा एक ब्रँड तयार केला. सध्या आता वेगवेगळ्या प्रकारची चिक्की करून विक्री करतात. यामध्ये शेंगदाणा, राजगिरा, तीळ चिक्की, खोबऱ्याची चिक्की अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्की बनवून विक्री करतात. 120 रुपयांमध्ये राजगिरा चिक्की 250 ग्रॅम आहे , शंभर रुपयाला शेंगदाणा चिक्की 250 ग्रॅम आहे. याच्या माध्यमातून या महिला 1 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न कमवतात.‎ विशेष म्हणजे मोलमजुरी करून त्यांना जेवढे उत्पन्न मिळत नव्हते तेवढे आता त्यांना मिळत आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Success Story : कधी काळी मोलमजुरी केली, बचत गटाने पालटलं महिलांचं नशीब, महिन्याला 1 लाख कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल