TRENDING:

Graduate Vadapav Nashik : परवडत नसल्याने नोकरी सोडली, इंजीनिअर तरुण विकतोय वडापाव, महिन्याला 1 लाखांची कमाई

Last Updated:

Graduate Vadapav Nashik : इंजीनिअरींगची पदवी घेतल्यावर राम हा पुण्यातील एका कंपनीत कामाला लागला. मात्र, 12 ते 15 हजार पगार हा कुठेच पुरत नव्हता. मागील 2 वर्षांपासून नाशिकमध्ये या तरुणाने ग्रॅज्यूएट वडापाव या नावाने आपले वडापावचे दुकान सुरू केले आहे.

advertisement
कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
advertisement

नाशिक - इंजीनिअरींगच्या शिक्षणानंतरही एका तरुणाने स्वतःचा वडापावचा व्यवसाय सुरू केला. इतरांच्या हाताखाली राबून देखील आपल्या गरज पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यापेक्षा छोटा का होईना पण स्वतःचा व्यवसाय करावा, याच विचारातून या तरुणाने हा निर्णय घेतला आणि आज हा तरुण महिन्याला तब्बल 1 लाख रुपयांची कमाई करत आहे. जाणून घेऊयात, या तरुणाची ही प्रेरणादायी कहाणी.

advertisement

राम गोडके असे या तरुणाचे नाव आहे. त्याचे इंजीनिअरींगचे शिक्षण झाले आहे. मात्र, नोकरीत परवडत नसल्याने त्याने नाशिकमध्ये स्वतःचा वडापावचा व्यवसाय सुरू केला आहे. इतरांच्या हाताखाली राबून आपल्या गरज पूर्ण होत नाही. त्यापेक्षा स्वतःचा छोटा का होईना पण व्यवसाय करावा, याच विचारातून त्याने हा व्यवसाय सुरू केला.

मागील 2 वर्षांपासून नाशिकमध्ये या तरुणाने ग्रॅज्यूएट वडापाव या नावाने आपले वडापावचे दुकान सुरू केले आहे. इंजीनिअरींगची पदवी घेतल्यावर राम हा पुण्यातील एका कंपनीत कामाला लागला. मात्र, 12 ते 15 हजार पगार हा कुठेच पुरत नव्हता. घरची परिस्थितीही हालाखीची असताना आपण कमावलेला पैसा हा घरीसुद्धा देता येत नाही. त्यामुळे 12 तास इतरांचा हाताखाली किती दिवस काम करत राहावे, असा प्रश्न त्याला पडला.

advertisement

अमरावतीमधील फेमस ग्रामीण झुणका भाकर, बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं कौतुकास्पद कार्य

यावर मात करण्यासाठी आपण स्वतःचा काही तरी व्यवसाय करावा, असा विचार त्याने केला. त्यानंतर वडापाव हा सर्वसामन्यांना परवडणारा आहे. त्यासाठी त्याने वडापावचा व्यवसाय सुरू केला. या क्षेत्रात नवीन असल्याने अनेक अडचणी आल्या. मात्र, त्याने या सर्व अडचणींवर मात करत या व्यवसायात आता चांगला जम बसवला आहे.

advertisement

या ठिकाणी त्याच्याकडे 20 पेक्षा अधिक प्रकारचे प्रकारचे वडापाव मिळतात. त्यामुळे या ठिकाणी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांची गर्दी पाहायला मिळते. प्रत्येक वडापावची किंमत ही वेगळी असल्याचे त्याने सांगितले. तुम्हालाही या वडापावची चव चाखायची असेल तर नाशिकमध्ये रविवार कारंज्याच्या हाकेच्या अंतरावर समर्थ ज्यूस सेंटरच्या बाजूला असलेल्या या ग्रॅज्यूएट वडापावला तुम्ही भेट देऊ शकतात.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Graduate Vadapav Nashik : परवडत नसल्याने नोकरी सोडली, इंजीनिअर तरुण विकतोय वडापाव, महिन्याला 1 लाखांची कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल