मुंबई - सध्या सर्वत्र नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. आज दसरा सण साजरा केला जात आहे. नवरात्रीच्या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी विविध सामाजिक तसेच कौतुकास्पद उपक्रम राबवले जातात. आज मुंबईतील अशा एकाच पंरपरेबाबत आपण जाणून घेणार आहोत.
मुंबईच्या नवरात्री चौक येथील हा उपक्रम आहे. मुंबईच्या घाटकोपर पश्चिम राजावाडी परिसरात एका चौकाचे नाव नवरात्री चौक आहे. याचे कारण इथे खूप मोठ्या प्रमाणात नवरात्री साजरी होते. 1969 साली स्थापन झालेले घाटकोपरचे राजावाडी नवरात्रौत्सव मंडळ गेले अनेक वर्षे नवरात्री सण परंपरेने साजरा करत आहे.
advertisement
याठिकाणी महापूजेचे आणि महा होमहवनचे आयोजन केले जाते. अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी 108 कुमारिकांना एकत्र येऊन पुजले जाते. त्यांनतर सर्व कुमारिकांच्या हस्ते कन्या आरती केली जाते. दरवर्षी एकूण 108 कुमारिकांचे एकत्र पूजन केल्यानंतर प्रत्येक कुमारिकेला जवळपास 50 पेक्षा जास्त भेटवस्तू दिल्या जातात.
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी!, आता 15 डब्यांच्या लोकल धावणार, नेमका काय बदल?
या कुमारिकांना त्यांच्या भेटू वस्तू घरी घेऊन जाण्यासाठी योग्य प्रकारची सोय देखील केली जाते. 3 ते 11 वर्ष वयोगटातील कुमारिका या ठिकाणी पूजल्या जातात. या कार्यक्रमाबद्दल सगळ्यांना माहिती असून अनेक जण या कार्यक्रमासाठी नावाची पूर्व नोंदणी करतात आणि त्यानुसार मुलींना नंबर दिले जातात, असे सांगण्यात आले. घाटकोपरचा राजावाडी नवरात्रौत्सव मंडळ हे मुंबईतील एकमेव मंडळ आहे, जे इतक्या मोठ्या प्रमाणावर कन्या आरती आणि कुमारिका पूजन करतात, तसेच सर्व परंपरांना देखील योग्य प्रकारे जपतात.