इमारतीखाली उत्सव सुरू असतानाच घडला अनर्थ
मिळालेल्या माहितीनुसार, नम्रता या अनेक वर्षांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होत्या. सततच्या उपचारांमुळे आणि प्रकृती खालावल्यामुळे त्या मानसिक तणावात होत्या. गुरुवारी दुपारी त्या त्यांच्या स्वयंपाकघरात गेल्या आणि तिथं असलेल्या खिडकीतून खाली उडी घेतली. ही घटना घडली तेव्हा इमारतीखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम सुरू होता.
advertisement
उपचारांपूर्वीच महिलेचा मृत्यू
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात दीर्घ आजारपण आणि मानसिक तणावामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 21, 2026 9:35 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai: किचनमध्ये गेली अन् उचलले टोकाचे पाऊल; मृत्यूचे कारण ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली
