इबाद हा रमजान निमित्त गावातील मस्जिदमध्ये नमाज अदा करून बाहेर पडला होता. त्यावेळीच त्याचं अपहरण करण्यात आलं. मुलगा जिवंत हवा असल्यास 23 लाख रूपये द्या, अशी मागणी करून अपहरणकर्त्यांनी फोन बंद केला. गावकऱ्यांनी रात्रभर इबादचा शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. अखेर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. बदलापूर ग्रामीण पोलीस आणि क्राइम ब्रांचने घटनास्थळी येऊन तपास केला.
advertisement
पोलिसांनी शोध घेतला असता गावात राहणाऱ्या अपहरणकर्त्याच्या घरातच इबादचा गोणीत भरलेला मृतदेह आढळून आला. रमजान सणाच्या तोंडावर ही हत्या झाल्याने गावात शोककळा पससली आहे .मात्र या हत्येचं कारण तर अतिशय धक्कादायक आहे. अपहरणामागचं कारण समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचं घराचं काम सुरू आहे. त्या घराच्या कामासाठी त्याला पैसे लागणार होते. याच कारणासाठी पैसे मिळवण्याकरता आरोपींनी या मुलाचं अपहरण करून 23 लाख रुपये मागितले असल्याचं सांगितलं जातंय. मात्र, मुलाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर नक्की ही हत्या पैशाच्या उद्देशाने केली गेली आहे की त्या मागचा आणखी काही उद्देश आहे हे समोर येईल