TRENDING:

BREAKING: मुंबई विमानतळावर मोठा अनर्थ टळला, 2 विमानांचे पंख एकमेकांना धडकले

Last Updated:

देशातील सर्वात हवाई वाहतुकीसाठी व्यस्त असलेल्या मुंबई विमानतळावर दोन विमानाची धडक झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यामुळे विमान वाहतुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले आहे. अशातच मुंबई विमानतळावर एक दुर्घटना घडली आहे.  दोन विमानाची धडक झाल्याची घटना घडली आहे. दोन विमानाची पंखं एकमेकांना घासली आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, देशातील सर्वात हवाई वाहतुकीसाठी व्यस्त असलेल्या मुंबई विमानतळावर दोन विमानाची धडक झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. एअर इंडिया आणि इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाची ही धडक झाली आहे. दोन्ही विमानाची पंखं एकमेकांना घासली आहे.  सुदैवाने दोन्ही विमानांचाा वेग कमी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दोन्ही विमानातील प्रवासी सुखरूप आहे. या दुर्घटनेमध्ये दोन्ही विमानांचं किरकोळ नुकसान झालं आहे.

advertisement

अधिक माहिती अशी की,  मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांचे पंख एकमेकांना धडकले.   एअर इंडियाचं विमान AI2732 हे  उड्डाणासाठी रनवेकडे जात होतं. तर त्याचवेळी इंडिगोच्या एका विमान लँडिंग झालं होतं. हे विमान टॅक्सी वे 'B1' ला जोडण्यासाठी टॅक्सिंइंग करत होतं. त्यावेळी  दोन्ही विमानांच्या उजव्या पंखांची टोकं एकमेकांना घासली. अपघाताच्या वेळी दोन्ही विमानं हे रनवेकडे धीम्या गतीने जात होती. त्यावेळी ही घटना घडला. या घटनेनंतर दोन्ही विमानं थांबवण्यात आली. विमानातील प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं आहे. दोन्ही विमानं दुरुस्तीसाठी रवाना झालीआहे. या प्रकरणी  डीजीसीएने चौकशी केली असून दोन्ही विमान कंपन्यांना अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.

advertisement

इंडिगोचं स्पष्टीकरण

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हळदीला उच्चांकी भाव, डाळिंब आणि आल्याला काय मिळाला दर? इथं चेक करा
सर्व पहा

इंडिगो एअरलाईन्सकडून खुलासा करण्यात आला आहे. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी हैदराबादहून मुंबईला येणाऱ्या फ्लाइट 6E 791 च्या विमानाचे पंखे लँडिंगच्या वेळी एअर इंडियाच्या विमानाला घासले गेले. या दुर्घटनेमध्ये  सर्व प्रवासी सुरक्षित आहे. विमानं पार्क केल्यानंतर सगळ्या प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवण्यात आलं आहे. अपघातग्रस्त विमानाची तपासणी सुरू आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्याची माहिती तातडीने देण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास केला जात आहे. असं इंडिगोकडून स्पष्ट करण्यात आलं.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
BREAKING: मुंबई विमानतळावर मोठा अनर्थ टळला, 2 विमानांचे पंख एकमेकांना धडकले
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल