अजित पवार यांनी एक्सवर पोस्ट करून जावेद पठाण यांच्या निधनाच्या वृत्तावर प्रतिक्रिया दिली आहे.मिरा-भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 साठीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार जावेद पठाण यांचं आकस्मिक दुःखद निधन झालं. जनसेवेचं ध्येय मनी बाळगणाऱ्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातील सदस्याचं असं निघून जाणं मनाला चटका लावून जाणारी बाब आहे. मात्र काळाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. मी जावेद पठाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो,असे अजित पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
advertisement
खरं तर जावेद पठाण यांना प्रभाग क्रमांक 22 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी मिळाली होती. त्यामुळे आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जावेद पठाण अर्ज भरायला गेले होते. जावेद पठाण यांनी अर्ज भरला आणि ते कार्यालयातून बाहेर पडले. अर्ज सादर करून बाहेर आल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले होते. त्यामुळे जावेद पठाण यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हळहळ व्यक्त होत आहे.
जावेद पठाण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार होता
भाजप महिला पदाधिकाऱ्याला पॅनिक अटॅक
दरम्यान मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत मुलीच्या उमेदवारीची मागणी करणाऱ्या भाजपच्या माजी महिला जिल्हाध्यक्ष वनिता बने यांची उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांना अस्वस्थतेचा झटका आल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
