18 जानेवारी (रविवार) रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. दुपारी चारच्या सुमारास विकास पासवान नशेमध्ये होता. त्याने नशेमध्ये आपण राहत असलेल्या परिसरातील अडीच वर्षीय कुत्र्याच्या पिल्लासोबत अश्लील कृत्य केले. हेच कृत्य करणं त्याला महागात पडले आहेत. विकास पासवान नशेमध्ये असताना त्याने एका अडीच महिन्यांच्या कुत्र्याच्या पिल्लाला घेऊन परिसरातील शौचालयामध्ये गेला. यावेळी सार्वजनिक शौचालयातून कुत्र्याचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज येऊ लागल्यामुळे लगेचच तिथे नागरिक जमा झाले. या विचित्र घटनेतून त्या कुत्र्याच्या पिल्लाची नागरिकांनी सुटका केली आणि नशेमध्ये असलेल्या विकासला पोलिसांच्या स्वाधीन केले.
advertisement
कुत्र्याच्या पिल्लासोबत अनैसर्गिक संबंध प्रस्थापित केल्यामुळे तो जोरजोरात किंचाळत होता. त्यामुळे तात्काळ परिसरातील नागरिकांनी त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. जेव्हा नागरिक जखमी कुत्र्यासोबत कुरार पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांनी गुन्हा न दाखल करून घेत दुसऱ्यादिवशी यायला सांगितले. शिवाय, पोलिसांनी विकासलाही अटक न करता त्याला सोडून दिले. नागरिकांनी विकासला पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं, पण कुरार पोलिसांनी त्याच्यावर कोणताही गुन्हा न नोंदवता त्याला सोडून दिल्याने प्राणीप्रेमी आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
