नेमके कसे आणि काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला साधना बोहरा या 20 जानेवारी रोजी घरातून पैसे काढण्यासाठी पायी एटीएमकडे निघाल्या. त्या रेल्वे स्टेशनजवळच्या एटीएमवर गेल्या तेव्हा दोन अनोळखी व्यक्ती आले आणि एटीएम खराब असल्याचे सांगून त्यांचे कार्ड घेतले.
यानंतर अनोळखी त्या व्यक्तींनी एटीएम कार्डची अदलाबदल करून बोहरा यांना बदललेले कार्ड दिले आणि लगेच निघून गेले. साधना यांनी ओळखीच्या व्यक्तीस कार्ड देऊन पैसे काढण्याचा प्रयत्न केला परंतु एटीएममध्ये पैसे आले नाहीत. थोड्या वेळाने त्यांच्या मोबाईलवर पैसे विड्रॉल झाल्याचे मेसेज आले. त्यांनी बँकेत जाऊन स्टेटमेंट काढले असता 52,022 रुपये त्यांच्या खात्यातून काढले गेले असल्याचे दिसून आले.
advertisement
साधना बोहरा यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात 20 जानेवारी रोजी या फसवणुकीसाठी तक्रार दाखल केली. पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि आरोपींचा शोध घेत आहेत. पोलीसांनी नागरिकांना एटीएमवर सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
