लोकलचा प्रवास आता अधिक सुरक्षित
मध्य रेल्वेवरील मुंब्रा येथे धावत्या लोकलमधून पडून प्रवशांचा मृत्यू झाल्याची घटना जून 2025 मध्ये घडली होती. त्यावर उपाय म्हणून स्वयंचलित दरवाजे असलेली सामान्य लोकल चालविण्याचा निर्णय घेतला. ही लोकल लवकरच मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहे पण अजूनही तारीख समोर आली नाही.
स्वयंचलित सामान्य लोकलची वैशिष्ट्ये?
advertisement
स्वयंचलित दरवाजे असलेली सामान्य लोकल ही चेन्नेईमधील इंटिग्रल कोट फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आली आहे. सामान्य लोकलच्या रचनेत बदल करुन हवा खेळती राहील अशा स्वरुपाची रचना करुन हा नवा डबा तयार करण्यात येणार आहे.शिवाय यात प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा बदल करण्यात येणार आहे तो म्हणजे वातानुकूलित लोकलप्रमाणेच एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाणे शक्य होणार आहे.
मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्या वाढवणार
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर सामान्य लोकल नंतर एसी लोकल प्रवाशांच्या सोयीसाठी धावतात. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सध्या 80 एसी लोकलच्या फेऱ्या होतात. हार्बल मार्गावर 14 एसी लोकल फेऱ्यांची वाढ होऊन मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या एकूण 94 फेऱ्या धावत आहेत. त्यात मध्य रेल्वेच्या ताफ्यात सध्या आठ रेक आहेत. या आठपैंकी एक रेक राखीव ठेवला जातो. तर एक एसी लोकल आल्यास नऊ पैकी आठच लोकल धावतील, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे.
