बाबा सिद्धीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. करनैल सिंह (हरियाणा), धर्मराज कश्यप (उत्तर प्रदेश) अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत. तर, तिसऱ्या आरोपीची ओळख पटली आहे. बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी तिन्ही आरोपी हे रिक्षाने घटनास्थळी आले. दोन्ही आरोपींनी बाबा सिद्दीकी यांच्या घराची आणि कार्यालयाच्या परिसराची रेकी केली होती. आरोपी जवळपास दीड ते दोन महिन्यापूर्वी मुंबईत आले होते अशी माहिती सूत्रांनी दिली.
advertisement
बिश्नोई गँगने काय म्हटले?
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर बिश्नोई गँगवर संशयाची सुई होती. सिद्दिकींची हत्या करणारे बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचे चौकशीत समोर आले होते. मात्र, ही हत्या सुपारी घेऊन केली असल्याचे समोर आले.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, " सलमान खान आम्हाला हे युद्ध नको हवे होते. मात्र, तू आमच्या भावाचे नुकसान केले. आज बाबा सिद्दिकीच्या कौतुकाचे गोडवे गात आहेत, हा बाबा सिद्दिकीवर दाऊद सोबत मोक्का कायदा लावण्यात आला होता. अनुज थापन आणि दाऊदला बॉलिवूड, राजकारण, मालमत्ता डीलसोबत जोडणे होते. आमचे कोणाशीही वैर नाही, पण जे सलमान खान आणि दाऊद टोळीला मदत करतात त्यांना आता हिशोब द्यावा लागेल. आमच्या भावांचे कोणी नुकसान केले तर आम्ही त्याची भरपाई केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये देण्यात आला आहे.
bishnoi gang social media post baba siddique murder
दीड महिन्यांपासून फिरत होती सुपारी…
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दिकी यांना ठार मारण्यासाठी मागील दीड महिन्यांपासून सुपारी फिरत होती. दिल्लीपासून ते पुण्यापर्यंत, मुंबई ते उत्तर प्रदेश-बिहार या राज्यातील टोळींपर्यंत सुपारी फिरली असल्याची चर्चा आहे. बाबा सिद्दिकांची हत्या करण्यासाठी कॅान्ट्रॅक्ट किलर्स देशभरात शोधाशोध सुरू होती. अखेर दीड महिन्यांपासून फिरत असलेली बाबा सिद्दिकी यांची सुपारी बिश्नोई गँगने घेतली असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली.
