चक्क बस चालकाचीच पाठराखण
मिळालेली माहिती अशी की, पीडित मुलगी नर्सरीत शिकत असून बसने प्रवास करताना तिच्यासोबत हा प्रकार घडला. मुलीच्या वागण्यात बदल जाणवल्याने पालकांनी तिला विश्वासात घेतले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. पालक जेव्हा तक्रार घेऊन शाळेत गेले, तेव्हा मुख्याध्यापिकेने पीडितेच्या कुटुंबाला मदत करण्याऐवजी चक्क बस चालकाचीच पाठराखण केली. शाळा प्रशासनाने या गंभीर प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
advertisement
ड्रायव्हर केबिनमध्ये शिरला अन्...
मुख्याध्यापिकेने दाद न दिल्यामुळे पालकांनी पीडित मुलीला घेऊन शाळेतच बस ड्रायव्हरला बोलावलं. यावेळी जसा तो ड्रायव्हर केबिनमध्ये शिरला, तशी ती 4 वर्षांची चिमुरडी प्रचंड घाबरली आणि आपल्या पालकांच्या मागे लपली. मुलीची ही भीती पाहून पालकांना खात्री पटली की तिच्यासोबत चुकीचे घडलं आहे. यानंतर वेळ न घालवता पालकांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपी चालकाला अटक केली आहे.
बसमध्ये कोणतीही महिला कर्मचारी नव्हती?
सदर घटनेने राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीचा फज्जा उडाल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. नियमानुसार स्कूल बसमध्ये महिला अटेंडंट असणे अनिवार्य असताना, या बसमध्ये कोणतीही महिला कर्मचारी नव्हती. शाळेच्या या हलगर्जीपणामुळेच नराधम चालकाचे फावल्याचे बोलले जात आहे. यापूर्वीही बदलापूरमध्ये अशाच एका प्रकरणाने देश हादरला होता, तरीही शाळा प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही.
गृहराज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले...
दरम्यान, मानसिक विकृतीतून अतिशय निंदनीय अशी घटना बदलापूर येथे घडली, शाळकरी मुलीवर स्कूल व्हॅन मध्ये चुकीचे प्रकार स्कूल वाहनचालकाने केल्याचे निदर्शनात आला आहे आणि पोलिसांनी सदर व्यक्तीला अटक केली आहे, शाळा प्रशासनाला या आधीच शालेय शिक्षण विभाग मार्फत गाईडलाईन्स दिले आहेत, असं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी म्हटलं आहे.
