नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई आणि उपनगरांत असलेल्या समुद्र किनारी आणि वेगवेगळ्या पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी होत असते. पर्यटकांची आणि मुंबईकरांची थर्टीफर्स्टच्या वेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते. हेच गर्दीचं मुख्य कारण लक्षात घेत बेस्टने नवीन वर्षाच्या आदल्या रात्री अतिरिक्त 25 बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे थर्टीफर्स्टला रात्री उशिरापर्यंत हेरिटेज टूर सह अन्य ठिकाणी प्रवास करता येईल. ही बस सेवा प्रवाशांना 31 डिसेंबरच्या संध्याकाळी साडेपाच वाजेपासून सुरू होणार आहे, जी 1 जानेवारीच्या पहाटेपर्यंत सुरू राहणार आहे. या हेरिटेज टूरमुळे पर्यटकांना मुंबईतील अनेक ठिकाणांचं दर्शन होणार आहे. वेगवेगळ्या मार्गांवर एकूण 25 बसेस चालवले जाणार आहेत.
advertisement
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, गोराई, मार्ते, दादर चौपाटी, गेट वे ऑफ इंडिया, बांद्रा बँडस्टँडसह अन्य ठिकाणी पर्यटकांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमांतर्फे विविध बसमार्गांवर रात्री 25 जादा बस सोडण्यात येणार आहेत. आवश्यकतेनुसार अधिक बस सोडण्यात येतील. याशिवाय हेरिटेज दूर बसही 31 डिसेंबर संध्याकाळी साडेपाच वाजतापासून 1 डिसेंबर रोजी पहाटेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, बेस्टच्या या उपक्रमांतर्गत प्रवाशांच्या मदतीसाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, जुहू, गोराई समुद्रकिनारा, चर्चगेट स्थानक (पूर्व) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी वाहतूक अधिकारी आणि बस निरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.
कोणकोणत्या मार्गावर बससुविधा मिळणार?
- ए २१- डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (म्युझियम) ते देवनार आगार बससंख्या - 3
- सी ८६- डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (म्युझियम) ते वांद्रे बसस्थानक (प.) बससंख्या - 3
- ए ११२- डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (म्युझियम) ते अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट) : बससंख्या - 4
- ए ११६- डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (म्युझियम) ते सीएसएमटी. बससंख्या - 5
- २०३- अंधेरी स्थानक (प): जुहू बीच - 2
- २३१- सांताक्रुझ (प) - जुहू बस स्थानक - 4
- ए २४७ आणि ए २९४ बोरिवली स्टेशन ते गोराई बीच आणि गोराई बीच ते बोरिवली स्टेशन - 2
- २७२- मालाड स्टेशन - मार्वे बीच - 2
