advertisement

Health Tips : थंडीपासून मिळेल संरक्षण, हिवाळ्यात खा विड्याचे पान, आणखी फायदे कोणते?

Last Updated:

हिवाळ्यात विड्याचे पान (नागवेल) खाण्याचे अनेक पारंपरिक आणि आरोग्यदायी फायदे सांगितले जातात. योग्य प्रमाणात घेतल्यास त्यातून अनेक फायदे होतात.

+
Betel

Betel leaf 

अमरावती : आजीचा बटवा आणि त्यातील विड्याचे पान हे आता लोप पावताना दिसत आहे. आपण लहान असताना प्रत्येक आजीकडे बटवा आणि त्यात विड्याचे पान असायचे. अनेकदा तर आजीच्या हाताने बनवलेलं पान ती सगळ्यांना द्यायची. पण, आता तसं काही होत नाही. जेवणानंतर विड्याचे पान खाणारी मंडळी आता खूप कमी झाली आहे. पण, हिवाळ्यात विड्याचे पान (नागवेल) खाण्याचे अनेक पारंपरिक आणि आरोग्यदायी फायदे सांगितले जातात. योग्य प्रमाणात घेतल्यास त्यातून अनेक फायदे होतात. त्याबाबत माहिती जाणून घेऊ.
1. हिवाळ्यात विड्याचे पान खाल्ल्यास थंडीपासून संरक्षण होते. विड्याचे पान उष्ण गुणधर्माचं असल्यामुळे हिवाळ्यात शरीराला ऊब मिळते आणि थंडीचा त्रास कमी होतो.
2. तसेच विड्याचे पान हे सर्दी, खोकल्यावर देखील उपयोगी ठरते. नाक वाहणे, घसा खवखवणे, खोकला यावर आराम मिळतो. घसा स्वच्छ राहण्यास मदत होते.
advertisement
3. पचनक्रिया सुधारण्यास देखील विड्याचे पान मदत करते. हिवाळ्यात मंदावलेलं पचन सुधारतं. गॅस, पोट फुगणं, अजीर्ण यावर विड्याचं पान उपयोगी पडतं.
4. तसेच तोंडाची स्वच्छता राखते. तोंडातील दुर्गंधी कमी होते, जंतुसंसर्ग टाळण्यास मदत होते.
5. त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी देखील विड्याचे पान उपयुक्त आहे. विड्याच्या पानात अँटिऑक्सिडंट गुणधर्म असल्यामुळे प्रतिकारशक्ती मजबूत होते.
advertisement
6. तसेच सांधेदुखी आणि अंगदुखीवर लाभदायक ठरते. हिवाळ्यात वाढणाऱ्या अंगदुखीवर उष्ण गुणधर्मामुळे आराम मिळतो. विड्याचे पान चघळल्याने ताजेतवाने वाटते आणि थकवा कमी झाल्यासारखे वाटते. विड्याचे पान अति प्रमाणात सुद्धा खाऊ नये. जेवणानंतर 1 पान खाणे पुरेसे आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : थंडीपासून मिळेल संरक्षण, हिवाळ्यात खा विड्याचे पान, आणखी फायदे कोणते?
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement