1. हिवाळ्यात विड्याचे पान खाल्ल्यास थंडीपासून संरक्षण होते. विड्याचे पान उष्ण गुणधर्माचं असल्यामुळे हिवाळ्यात शरीराला ऊब मिळते आणि थंडीचा त्रास कमी होतो.
2. तसेच विड्याचे पान हे सर्दी, खोकल्यावर देखील उपयोगी ठरते. नाक वाहणे, घसा खवखवणे, खोकला यावर आराम मिळतो. घसा स्वच्छ राहण्यास मदत होते.
New Year Celebration : 31 डिसेंबरला एकादशी; मटण, चिकन खावं की नाही? खाल्ल्यास काय होतं? Video
advertisement
3. पचनक्रिया सुधारण्यास देखील विड्याचे पान मदत करते. हिवाळ्यात मंदावलेलं पचन सुधारतं. गॅस, पोट फुगणं, अजीर्ण यावर विड्याचं पान उपयोगी पडतं.
4. तसेच तोंडाची स्वच्छता राखते. तोंडातील दुर्गंधी कमी होते, जंतुसंसर्ग टाळण्यास मदत होते.
5. त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी देखील विड्याचे पान उपयुक्त आहे. विड्याच्या पानात अँटिऑक्सिडंट गुणधर्म असल्यामुळे प्रतिकारशक्ती मजबूत होते.
6. तसेच सांधेदुखी आणि अंगदुखीवर लाभदायक ठरते. हिवाळ्यात वाढणाऱ्या अंगदुखीवर उष्ण गुणधर्मामुळे आराम मिळतो. विड्याचे पान चघळल्याने ताजेतवाने वाटते आणि थकवा कमी झाल्यासारखे वाटते. विड्याचे पान अति प्रमाणात सुद्धा खाऊ नये. जेवणानंतर 1 पान खाणे पुरेसे आहे.





