TRENDING:

Mumbai News: खेळता-खेळता मित्राचा गेम केला, भांडुपमधील ८ वीच्या मुलाला मित्रांनीच संपवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Last Updated:

Mumbai Crime News: मित्रांसोबत खेळायला गेलेल्या एका १४ वर्षीय मुलाचा मृतदेह तलावात सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, या अल्पवयीन मुलाच्या शवविच्छेदन अहवालाने हत्येचा प्रकार समोर आला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मित्रांसोबत खेळायला गेलेल्या एका १४ वर्षीय मुलाचा मृतदेह तलावात सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. सुरुवातीला हा अपघात असल्याचे वाटत असले तरी, शवविच्छेदन (Post-mortem) अहवालाने पोलिसांनाही चक्रावून सोडले. सिद्धार्थ लोंढे असे या मृत मुलाचे नाव असून, त्याच्याच तीन अल्पवयीन मित्रांनी त्याची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आता मुलांच्या मित्रांकडून असं पाऊल उचलण्यात आल्याने पालकांना मोठा धक्काच बसला आहे.
खेळता-खेळता मित्राचा गेम केला, भांडुपमधील ८ वीच्या मुलाला मित्रांनीच संपवला, मुंबईतील खळबळजनक घटना
खेळता-खेळता मित्राचा गेम केला, भांडुपमधील ८ वीच्या मुलाला मित्रांनीच संपवला, मुंबईतील खळबळजनक घटना
advertisement

नेमकं प्रकरण काय?

भांडुपच्या तुळशेत पाडा परिसरात राहणारा सिद्धार्थ २२ फेब्रुवारीला दुपारी ३ च्या सुमारास 'खेळायला जातो' असे सांगून घराबाहेर पडला. मात्र, रात्र झाली तरी तो परतला नाही. चिंतेत असलेल्या पालकांनी शोधाशोध करून अखेर भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असता, दुसऱ्या दिवशी २३ फेब्रुवारीला मुलुंडच्या विहार तलावाजवळ सिद्धार्थचा मृतदेह आढळून आला.

advertisement

शवविच्छेदन अहवालाने फिरवले तपासाचे चक्र

सुरुवातीला सिद्धार्थचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, डॉक्टरांच्या पोस्टमार्टम रिपोर्टने सर्वांनाच धक्का दिला. अहवालात नमूद करण्यात आले होते की, सिद्धार्थच्या फुफ्फुसात आणि पोटात पाणी नव्हते, म्हणजेच त्याचा मृत्यू पाण्यात बुडून झाला नव्हता. त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर जखम आणि अंतर्गत रक्तस्राव झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे हा घातपात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

advertisement

'दादागिरी'चा वचपा काढण्यासाठी कट

पोलिसांनी संशयावरून सिद्धार्थच्या तीन मित्रांना ताब्यात घेतले. हे तिघेही अल्पवयीन असून १४ ते १५ या वयोगटातील आहेत. सुरुवातीला त्यांनी सिद्धार्थ बुडाल्याचा बनाव रचला, मात्र पोलिसांनी चौकशीत पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींनी सांगितले की, सिद्धार्थ त्यांच्यावर नेहमी दादागिरी करायचा. त्याला धडा शिकवण्यासाठी त्यांनी त्याला तलावाजवळ नेले आणि काठीने डोक्यावर प्रहार केला. तो बेशुद्ध पडल्यानंतर त्यांनी त्याला पाण्यात फेकून दिले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तुम्ही कधी खाल्लीये का मासे चकली? दुर्गा यांचा व्यवसाय हिट,महिन्याला 1 लाख कमाई
सर्व पहा

याप्रकरणी तिन्ही अल्पवयीन आरोपींची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली असून भांडुप पोलीस अधिक तपास करत आहेत.

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: खेळता-खेळता मित्राचा गेम केला, भांडुपमधील ८ वीच्या मुलाला मित्रांनीच संपवला, मुंबईतील खळबळजनक घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल