TRENDING:

'आज हंगामा होगा, 12 बजे ब्लास्ट होगा' संजय राऊतांच्या घराबाहेर कारवर मेसेज, मुंबईत खळबळ

Last Updated:

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर एका धुळखात पडलेल्या मारुती सुझुकी वॅगनॉर कारवर हा मजकूर लिहिला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राजेश शिंदे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

मुंबई: मुंबईत महापालिका निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत यांना धमकी देण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या घराबाहेर एका धुळखात पडलेल्या कारवर 'आज हंगामा होगा, आज रात्र १२ बजे ब्लास्ट होगा' असा मजकूर  लिहिला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाला आहे.

advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर एका धुळखात पडलेल्या मारुती सुझुकी वॅगनॉर कारवर हा मजकूर लिहिला आहे. 'आज हंगामा होगा, आज रात्र १२ बजे ब्लास्ट होगा' असं या कारच्या काचेवर लिहिलं आहे. तसंच कारच्या पाठीमागील काचेवर 'CST में बॉम्ब ब्लास्ट होगा' असा मजकूर लिहून स्माईलीचा इमोजी आहे.

advertisement

हा प्रकार समोर आल्यानंतर तातडीने याची माहिती पोलिसांना देण्यात आली. बॉम्ब पथक आणि मुंबई पोलीस संजय राऊत यांच्या घरी दाखल झाले आहे. एकीकडे राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू आहे. तर दुसरीकडे नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र गर्दी वाढत चालली आहे. अशातच अशा प्रकारच्या मेसेजमुळे खळबळ उडाली आहे. पोलीस दलाने या मेसेजचही गांभीर्याने दखल घेतली आहे. राऊत यांच्या घरी मुंबई पोलीस आणि बॉम्बशोधक पथक दाखल झाले आहे.

advertisement

कार कुणाची? 

संजय राऊत यांच्या घराबाहेर उभी असलेली मारुती सुझुकी वॅगनॉर कार कुणाची आहे, ही कार कुणी इथं उभा केली, याची माहिती घेतली जात आहे. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासायला हाती घेतले आहे. हा धमकीचा मेसेज कुणी लिहिली आहे, याचा शोध घेतला जात आहे.

नाराज उमेदवारांचं तर कृत्य नाही ना? 

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी मिळत नसल्याने घेतला निर्णय,तरुणाने केली रेशीमची शेती, कमाई तर पाहाच
सर्व पहा

तसंच, सध्या महापालिका निवडणुकीसाठी तिकीट वाटप पूर्ण झालं आहे. तिकीट न मिळाल्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या नाराजीचा वणवा पेटला आहे. ठाकरे गटामध्येही नाराज उमेदवारांची यादी मोठी आहे. एखाद्या नाराज उमेदवाराने तर हे कृत्य केलं नाही ना, या दृष्टीनेही पोलीस तपास करत आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
'आज हंगामा होगा, 12 बजे ब्लास्ट होगा' संजय राऊतांच्या घराबाहेर कारवर मेसेज, मुंबईत खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल