खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे युवकचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अमित ढमाळ हे महापालिका निवडणुक लढवण्यास इच्छुक होते.पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत झालेल्या जागावाटपात ही जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुटली होती. त्यामुळे अमित ढमाळ प्रचंड नाराज होते.या दरम्यान अमित ढमाळ यांनी बंडखोरी करून प्रभाग क्रमांक 168 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या उमेदवारी अर्जाने इतर पक्षांना फटका बसण्याची शक्यता आहे.
advertisement
amit dhamal
प्रभाग क्रमांक 168 मधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी त्यांची बहीण डॉ सहीदा खान यांना उमेदवारी दिली होती. तर भाजप-सेनेचा उमेदवार म्हणून भाजपचे आदित्य पानसे निवडणूकीच्या रिंगणात आहेत.आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठातून सुधीर खातू यांना उमेदवारी दिली होती.आता अमित ढमाळ यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केल्याने भाजप उद्धव ठाकरे शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
