न्यू इयर पार्टीसाठी खास स्टार्टर, घरीच बनवा चिकन कबाब, आवडीने खातील सर्व, Video
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Mohan Najan
Last Updated:
पार्टीची सुरुवातच जर स्वादिष्ट स्टार्टरने झाली तर संपूर्ण मेनूची मजा द्विगुणीत होते. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी चिकन कबाब रेसिपी.
मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घरगुती पार्टी, मित्रमैत्रिणींच्या गेट-टुगेदर आणि फॅमिली सेलिब्रेशनचे नियोजन जोरात सुरू झाले आहे. अशा खास प्रसंगी पार्टीच्या मेनूमध्ये पटकन तयार होणारा चविष्ट आणि सगळ्यांच्या पसंतीचा स्टार्टर असणं फार महत्त्वाचं असतं. कारण पार्टीची सुरुवातच जर स्वादिष्ट स्टार्टरने झाली तर संपूर्ण मेनूची मजा द्विगुणीत होते. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी चिकन कबाब रेसिपी. हे कबाब कमी वेळात तयार होतात, मसाल्यांचा योग्य समतोल असतो आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. विशेष म्हणजे हे चिकन कबाब तव्यावर, पॅनमध्ये किंवा ओव्हनमध्येही सहज बनवता येतात.
चिकन कबाब साहित्य
200 ग्रॅम चिकन (बोनलेस)
1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर / बेसन
1 टीस्पून लाल तिखट
½ टीस्पून काळी मिरी पावडर
½ टीस्पून जिरे पावडर
½ टीस्पून गरम मसाला
मीठ चवीनुसार
2 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
1 टीस्पून तेल
मिक्सरमध्ये वाटण्याची पद्धत
चिकनचे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये घाला. त्यात लाल तिखट, जिरे पावडर, गरम मसाला सगळे टाकून घ्या. मिक्सरमध्ये जास्त बारीक नाही असे वाटा (थोडे कण राहू द्या). हे मिश्रण एका भांड्यात काढा. त्यात कॉर्नफ्लोअर टाका आणि छान एकत्र करून घ्या.
advertisement
कबाब बनवणे
हाताला थोडे तेल लावून कबाबाचा आकार द्या. तवा गरम करून थोडे तेल घाला. मध्यम आचेवर कबाब दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत शेकून घ्या. झाकण ठेवून 1-2 मिनिटे वाफ द्या म्हणजे आतून नीट शिजतील.
टीप
view commentsमिश्रण सैल वाटले तर थोडे ब्रेडक्रम्ब्स घाला. जास्त घट्ट झाले तर 1-2 चमचे दही घाला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 30, 2025 5:24 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
न्यू इयर पार्टीसाठी खास स्टार्टर, घरीच बनवा चिकन कबाब, आवडीने खातील सर्व, Video









