मुंबईत आज शिवसेना–भाजप यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मुंबईत आज शिवसेना आणि भाजप यांची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक आज दुपारी २ वाजता, वसंत स्मृती, दादर येथे पार पडली . या बैठकीत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात सीट शेअरिंग तसेच प्रचार (कॅम्पेन) रणनीतीवर सविस्तर चर्चा होणार आहे.
शिवसेना 125 जागा मिळाव्या यासाठी आग्रही
advertisement
मुंबई महापालिकेसाठी भाजप जवळपास 150 हून अधिक जागांवर लढण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेला भाजप जवळपास 70-80 जागा देण्यास तयार असल्याची माहिती मिळत आहे. भाजपच्या कोट्यातून आरपीआयसाठी देखील 2-3 जागा देण्यात येणार आहे. शिवसेनेकडून 125 जागा मिळाव्या यासाठी आग्रह होता.
52 जागा शिवसेनेला सोडण्याची भाजपची तयारी
दरम्यान, आजच्या बैठकीत शिवसेनेचे 2017 सालचे माजी नगरसेवक शिंदेंसोबत आले आहेत, त्यांच्या संदर्भात निश्चिती केल्यानंतर भाजपकडून थेट आकडेवारी सोबत जागांची यादी समोर आली आहे. शिंदेंची ताकद असलेल्या 52 जागा शिवसेनेला सोडण्याची भाजपची तयारी आहे. शिंदेंच्या शिवसेनेत 2017 सालचे जवळपास 47 नगरसेवक आहेत.
चर्चेदरम्यान वादावादी होण्याची शक्यता
भाजप आणि शिवसेनेत परवा वॉर्डनिहाय चर्चा होणार, ज्याद्वारे जागावाटपाची निश्चित होणार आहे. मात्र, उबाठामध्ये असलेल्या माजी नगरसेवकांच्या जागा शिंदेंना देण्यास भाजप अनुकूल नाही. अशात, यावर दोन्ही पक्षांमध्ये चर्चेदरम्यान वादावादी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
2017 सालचे गणित काय?
2017 साली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली होती, तेव्हा राज्यात युतीमध्ये असूनही भाजप आणि शिवसेना मुंबई महापालिकेत वेगळी निवडणूक लढले होते. या निवडणुकीत भाजप-शिवसेनेमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली होती. शिवसेनेने 84 तर भाजपने 82 जागा जिंकल्या होत्या, यानंतर मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा शिवसेनेचा महापौर बसला. या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे एकत्र निवडणूक लढण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूंचा सामना भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेविरुद्ध आहे.
हे ही वाचा :
