TRENDING:

BMC Election: पुन्हा पडला मिठाचा खडा, वंचित आणि काँग्रेसमध्ये आघाडीबद्दल मोठी बातमी, वडेट्टीवार आता स्पष्ट बोलले

Last Updated:

शरद पवार सोबत येत असतील तर त्यांच्यासोबत नाहीतर वंचित आघाडी येत असेल तर त्यांच्यासोबत लढायचं. जर येणार नसतील,

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई:  मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित आघाडीमध्ये फूट पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला इशारा दिला आहे. तर दुसरीकडे,  "कार्यकर्त्यांच्या भावना आहे. आम्ही स्वतंत्र्य लढायचं आहे. किंवा शरद पवार सोबत येत असतील तर त्यांच्यासोबत नाहीतर वंचित आघाडी येत असेल तर त्यांच्यासोबत लढायचं. जर येणार नसतील, स्वतंत्र्य लढण्याचा आमचा निर्णय फायनल आहे' अशी परखड भूमिका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
News18
News18
advertisement

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी वंचितसोबत मुंबईत आघाडी करणार आहे की नाही. याबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे.

"अनेक ठिकाणी चांगली चर्चा झाली आहे. काँग्रेसच्या प्रमुख मंडळीशी बोलणं झालं आहे. जिथे शक्य आहे तिथे आघाडी करणार आहोत. ज्या ठिकाणी शक्य नाही तिथे एकला चलो रे राहणार आहे. वंचितने मुंबईत आणि नागपूरमध्ये युती करावी, असा प्रकाश आंबेडकर यांच्याकडून निरोप असल्याची मला माहिती होती. त्या भरवश्यावर मी म्हणालो की, आमची आघाडी होणार आहे. भाजप सोडून सगळ्यांसोबत युती करणार असं प्रकाश आंबडेकर यांचं स्टेटमेंट आहे. आमची भूमिका ही वैचारिक पक्षांसोबत आघाडी करावी, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे वंचित हा आमच्यासमोर पर्याय आहे. आघाड्यासाठी आम्ही आजही तयार आहोत. फक्त मनसे सोडून, जर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार असेल तर आम्हाला कोणतीही अडचण नाही, आजही नाही, उद्याही नाही' असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.

advertisement

"आघाडीमध्ये घटक आल्याचं पाहून पक्षातील आमच्या नेत्यांचं मत आहे. त्यांना काम करायचं आहे. कार्यकर्त्यांच्या भावना आहे. आम्ही स्वतंत्र्य लढायचं आहे. किंवा शरद पवार सोबत येत असतील तर त्यांच्यासोबत नाहीतर वंचित आघाडी येत असेल तर त्यांच्यासोबत लढायचं. जर येणार नसतील, स्वतंत्र्य लढण्याचा आमचा निर्णय फायनल आहे' असंही वडेट्टीवार म्हणाले.

'दोन दिवसांत सगळं कळेल'

advertisement

"माझ्या माहितीप्रमाणे वंचित आघाडीची काँग्रेससोबत चर्चा झाली आहे. त्यांची इतर कुठल्या पक्षासोबत चर्चा सुरू आहे, अशी माहिती आहे. उद्या शिवसेना शिंदेंसोबत युती करू शकतात. किंवा उद्धव ठाकरेंच्या बरोबर युती करतात, हे दोन दिवसांमध्ये कळेल. अर्ज भरण्यासाठी दोनच दिवस शिल्लक आहे. त्यामुळे दोन दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल' असंही ते म्हणाले.

"...तर प्रकाश आंबेडकरांना लखलाभ"

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
12 वर्षांपूर्वी घेतला निर्णय, शेतकरी करतोय आता फायद्याची शेती, लाखोंचे उत्पन्न
सर्व पहा

"तोंड उघडलं तर काँग्रेसला फटका बसेल. प्रकाश आंबेडकर यांनी बऱ्याच वेळा तोंड उघडलं आहे. त्याचा काही फरक पडत नाही. ते काय म्हणाले निदान आमच्या कानावर तरी येईल. त्याची माहिती तरी होईल. उगाच असं वक्तव्य करून फायदा नाही. आम्ही काही वंचितला विरोध केला नाही, वंचितच्या नेत्यावर काही बोललो नाही. तरी आंबेडकर धमकी देणार असतील, तर त्यांना लखलाभ आहे, असं म्हणत वडेट्टीवार यांनी आंबेडकरांच्या टीकेला उत्तर दिलं.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
BMC Election: पुन्हा पडला मिठाचा खडा, वंचित आणि काँग्रेसमध्ये आघाडीबद्दल मोठी बातमी, वडेट्टीवार आता स्पष्ट बोलले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल