अलीकडेच, मुंबई महापालिकेच्या पर्जन्यजल विभागाने शुक्रवारी निविदा मागवल्या आहेत. कंत्राट पद्धतीने दोन वर्षांसाठी पंपासाठीच्या निविदा मागवण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, पर्जन्यजल वाहिन्यांची कामे मुंबईमध्ये सर्वच ठिकाणी सुरू असूनही पंपाचा आकडा वाढताच आहे. पर्जन्यजल विभागाने महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये किती पाणी उपसण्याच्या पंपाची गरज आहे, याचा आकडा मागितला आहे. त्याप्रमाणे महानगर पालिकेच्या वेगवेगळ्या विभागांना ते संच पुरवले जाणार आहेत. गेल्या वर्षी महापालिकेकडे एकूण 422 पंप होते, पण आता यावर्षी हाच आकडा 547 पर्यंत गेलेला आहे. गरजेप्रमाणे पंपांचा बदल केला जात आहे.
advertisement
पर्जन्य जलवाहिन्या विभागातील अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2026 या वर्षासाठी 547 पंपाची मागणी करण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी पंपाची गरज नाही, त्या ठिकाणी ती ठेवली जाणार नाही. बीएमसीने जाहीर केलेल्या निविदांमध्ये पाणी उपसा पंपाच्या दोन वर्षांचा अंदाजित खर्च 142 कोटींपर्यंतचा आहे. 547 पाणी उपसा पंप विभागाप्रमाणे लावले जाणार आहेत. शहरी भागामध्ये 146 पंप, पश्चिम उपनगरामध्ये 223 पंप तर पूर्व उपनगरामध्ये 178 पंप लावावे लागणार असल्याची माहिती पर्जन्य जलवाहिन्या विभागातील अधिकार्यांनी दिली आहे. याशिवाय, सध्या मुंबईमध्ये नाले सफाईचे काम सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. पावसाळ्याच्या आधी सर्व नाल्यांची सफाई करण्याचे बीएमसीने उद्दिष्ट ठेवले आहे.
