अलीकडेच नोकरभरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या तिन्ही खंडपीठामध्ये ही नोकरभरती केली जाणार आहे. लघुलेखक (लोअर), लघुलेखक (हायर), लिपिक, वाहनचालक, शिपाई/ हमाल/ फरश अशा पदांसाठी एकूण 2331 रिक्त जागांसाठी नोकर भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार हायकोर्टाच्या अधिकृत वेबसाइट bombayhighcourt.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 15 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार असून उमेदवारांना 5 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज सादर करण्याचा अखेरचा दिवस असणार आहे. ऑनलाईन अर्ज आणि पेमेंट करण्याचा अखेरचा दिवस एकच असणार आहे.
advertisement
एकूण पदांची संख्या 2331 इतकी आहे. कोणकोणत्या पदांसाठी किती शैक्षणिक पात्रता आहे, जाणून घेऊया... लघुलेखक (हायर) पदासाठी एकूण 19 रिक्त जागा आहेत. या पदासाठी उमेदवार ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे, शॉर्ट हैण्ड 100 WPM आणि इंग्रजी टायपिंग 40 WPM ची परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. लघुलेखक (लोअर) पदासाठी 56 रिक्त जागा आहेत. या पदासाठी उमेदवार ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे, शॉर्ट हैण्ड 80 WPM आणि इंग्रजी टायपिंग 40 WPM ची परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. लिपिक पदासाठी 1332 रिक्त जागा आहेत. या पदासाठी उमेदवार ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे, संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 WPM) आणि MS-CIT किंवा समतुल्य अशा परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
ड्रायव्हर पदासाठी 37 रिक्त जागा आहेत. त्यासाठी 10वी (SSC) उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे हलके मोटार वाहन चालक परवाना (LMV) असं आवश्यक आहे. शिवाय ड्रायव्हिंगचा तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. शिपाई पदासाठी 887 रिक्त जागा आहेत. त्यासाठी फक्त 7 वी उत्तीर्णची आवश्यकता आहे. या सर्व पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 38 वर्षे असणे आवश्यक आहे. तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट दिली आहे. सर्व श्रेणीतील (OPEN/ OBC/ EWS/ SC/ ST/ PwD) उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 1000 रुपये निश्चित करण्यात आले आहे. उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारावर केली जाईल. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिक माहितीसाठी हायकोर्टाची अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे अनिवार्य आहे.
- लघुलेखक (लोअर) पदासाठीची अधिकृत जाहिरात: https://drive.google.com/file/d/1sj4QA68gEi-rAdRQ1Mtpm3rAO9KOFfep/view
- लघुलेखक (हायर) पदासाठीची अधिकृत जाहिरात: https://drive.google.com/file/d/1Y9lryajhbEATp3v0rIhL3eDHzFUvvFUZ/view
- लिपिक पदासाठीची अधिकृत जाहिरात: https://drive.google.com/file/d/1QAZCdTxozHPJsUmLq30xb_T43k23ZQwZ/view
- वाहनचालक पदासाठीची अधिकृत जाहिरात: https://drive.google.com/file/d/1xFJ6pdnhHdUYNE3ByykLqm1j3PchEbIv/view
- शिपाई/हमाल/फरश पदासाठीची अधिकृत जाहिरात: https://drive.google.com/file/d/1lPdAEmy7OZ6vBqd7KQ6kcKvvR6DiUtcL/view
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अद्याप सुरूवात झाली नसून 15 डिसेंबर 2025 पासून सुरूवात होणार आहे.
