TRENDING:

Andheri Firing: खिडकीतून गोळी घरात शिरली! ऑडिशनची प्रॅक्टिस करणारा मॉडेल थोडक्यात बचावला; अंधेरीत पुन्हा शूटआऊट ॲट लोखंडवाला

Last Updated:

1991 साली लोखंडवाला फर्स्ट क्रॉस रोडवरील ‘स्वाती’ इमारतीत पोलिस आणि माफियांमध्ये चकमक झाली होती. पुन्हा एकदा 34 वर्षांनी, स्वाती इमारतीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘नालंदा’इमारतीत पुन्हा गोळीबाराची घटना घडली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रतिनिधी- संकेत वरक, मुंबई
News18
News18
advertisement

मुंबई: मुंबईत एकेकाळी अंडरवर्ल्डची दहशत होती. पायधुणी, नागपाडा, झवेरी बाजार, मदनपुरा, डोंगरी या भागांमध्ये माफियांचं जाळं पसरलेलं होतं. हाजी मस्तानपासून दाऊद इब्राहिमपर्यंत अनेक माफियांचे हे बालेकिल्ले होते. मात्र या यादीत मागे पडलेलं एक नाव म्हणजे अंधेरी. अंधेरीतील वर्सोवा आणि लोखंडवाला परिसरातही अनेक माफियांचं येणंजाणं होतं. 1991 साली लोखंडवाला येथे गाजलेल्या शूटआऊटचे गोळीबाराचे आवाज आजही त्या गल्ल्यांमध्ये घुमत असल्याचं म्हटलं जातं. 1991 मध्ये लोखंडवाला फर्स्ट क्रॉस रोडवरील ‘स्वाती’ इमारतीत पोलिस आणि माफियांमध्ये चकमक झाली होती. त्यानंतर तब्बल 34 वर्षांनी, स्वाती इमारतीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘नालंदा’ इमारतीत पुन्हा गोळीबाराची घटना घडली आहे.

advertisement

तब्बल 34 वर्षांनंतर अंधेरीमध्ये घडलेल्या गोळीबारामुळे परिसरामध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे. रविवारचा (18 जानेवारी) दिवस, दुपारी साडेबाराच्या दरम्यान ‘नालंदा’ इमारतीमध्ये गोळीबाराची घटना घडली. इमारतीच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. इमारतीसमोर सुरू असलेल्या एका अंडर- कन्स्ट्रक्शन साईटवरूनच हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गोळीबार करणारी व्यक्तीचा अद्याप शोध लागला नसून आरोपी सध्या तरी फरारच आहे. पोलीस प्रकरणाचा सध्या तपास करीत आहेत. दुसऱ्या मजल्यावर झाडलेली गोळी इमारतीच्या भिंतीवरील एका लाकडाला लागली, तर चौथ्या मजल्यावर झाडलेली गोळी थेट घरात घुसली. त्या घरात प्रतीक बैद नावाचा भाडेकरू राहत असून तो पेशाने मॉडेल आहे.

advertisement

रविवारी दुपारी प्रतीक घरी ऑडिशनची प्रॅक्टिस करत असताना ही गोळी त्याच्या खिडकीतून आत शिरली. प्रतीकपासून अवघ्या काही सेंटीमीटर अंतरावरून गोळी गेली आणि थेट भिंतीला जाऊन आदळली. प्रथमदर्शनी कन्स्ट्रक्शन साईटवरून काहीतरी येऊन आदळल्याचा त्याला भास झाला. गोळी झिजलेली असल्यामुळे ती बुलेट आहे, याची त्याला तात्काळ जाणीवही झाली नाही. इमारतीतील रहिवाशांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर ओशिवारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर प्रतीकच्या लक्षात आलं की तो थोडक्यात मृत्यूच्या तावडीतून बचावला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनचे दर वाढले, कापूस आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

दुसऱ्या मजल्यावर राहणारा नीरज हा लेखक असून, नीरज आणि प्रतीक यांच्यातील एक समान दुवा म्हणजे फिल्म इंडस्ट्री. त्यामुळे हा केवळ योगायोग आहे की काही वेगळंच टार्गेट होतं, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. घटनास्थळावरून ओशिवारा पोलिसांनी दोन काडतुसे आणि प्रतीकच्या खिडकीला लागलेला पडता पुरावा म्हणून जप्त केला आहे. इमारतीच्या बाहेर असलेल्या CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. नेमका हल्ला कुणी केला? टार्गेट कोण होतं? घटनेचा फिल्म इंडस्ट्रीशी काही संबंध आहे का? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित झाले असून, त्यांची उत्तरं पोलीस तपासत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Andheri Firing: खिडकीतून गोळी घरात शिरली! ऑडिशनची प्रॅक्टिस करणारा मॉडेल थोडक्यात बचावला; अंधेरीत पुन्हा शूटआऊट ॲट लोखंडवाला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल