TRENDING:

'आमच्या 'त्या' उमेदवाराचा अर्ज रद्द करा' इच्छुकाच्या स्मार्ट खेळीने भाजपमध्ये खळबळ, निवडणूक आयोगाला पत्र

Last Updated:

हा एबी फॉर्म नजरचुकीने दिला होता. भाजपने नंतर हा एबी फॉर्म शिल्पा केळुस्कर यांच्याकडून परत घेतला होता. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राहुल झोरी, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

मुंबई :  महापालिका निवडणुकीमध्ये सत्ताधारी महायुतीमध्ये नाराजांच्या संतापाचा वणवा पेटला आहे. पक्ष कार्यालयाबाहेर इच्छुक नगरसेवक उपोषण करत आहे. तर कुठे समजूत काढण्याचे प्रकार सुरू आहे. पण, अशातच मुंबईत भाजपच्या एका उमेदवाराने केलेल्या गोंधळामुळे भाजपला निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्याची वेळ आली आहे. या महिला उमेदवाराने भाजपने दिलेल्या एबी फॉर्मची डुप्लिकेट कॉपी काढून निवडणूक आयोगात दाखल केली आहे.

advertisement

मुंबई भाजपमधील उमेदवारीचा घोळ संपता संपेना असं झालं आहे. भाजपने इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले होते. पण वॉर्ड क्रमांक १७३ मध्ये इच्छुक उमेदवार शिल्पा केळुस्कर यांनी मात्र तर कहर केला. शिल्पा केळुस्कर यांना पक्षाने एबी फॉर्म दिला होता. पण, हा एबी फॉर्म नजरचुकीने दिला होता. भाजपने नंतर हा एबी फॉर्म शिल्पा केळुस्कर यांच्याकडून परत घेतला होता.

advertisement

पण, शिल्पा केळुस्कर यांनी  शिल्पा केळुस्कर यांनी डुप्लिकेट एबी फॉर्म तयार केला आणि तो निवडणूक आयोगाकडे दाखलही केला. ही बाब लक्षात आल्यानंतर भाजपमध्ये एकच खळबळ उडाली. भाजपचे   मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी आता निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे.

advertisement

शिल्पा केळुस्कर यांना पक्षाच्या वतीने नजरचुकीने एबी फॉर्म दिला होता. नंतर तो परतही घेतला होता. पण, त्यांनी तो बनावट फॉर्म दाखल केला आहे, त्यांचा हा फॉर्म आता रद्द करावा, अशी मागणीच साटम यांनी  महापालिकेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कापूस आणि सोयाबीन दरात पुन्हा वाढ, तुरीला काय मिळाला भाव? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

आता महापालिका निवडणूक अधिकारी हा अर्ज रद्द करतात की, कायम ठेवतात हे पाहण्याचं ठरणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
'आमच्या 'त्या' उमेदवाराचा अर्ज रद्द करा' इच्छुकाच्या स्मार्ट खेळीने भाजपमध्ये खळबळ, निवडणूक आयोगाला पत्र
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल