वेळेवर पोहोचणार मुंबईकर!
मध्य रेल्वेवरील वेळापत्रकाचा मुख्य नुसकान हे सकाळच्या वेळेत ऑफिसला जाणाऱ्या प्रवाशांना भोगावे लागते. या सर्व कारणांमुळे वाशांच्या आक्रमक भूमिकेनंतर अखेर मध्य रेल्वे प्रशासन सतर्क झाले असून लोकल सेवेतील विलंब कमी करण्यासाठी तातडीचे उपाय राबवण्यास सुरुवात केली आहे.
एक्सप्रेसच्या अडथळ्याविना धावणार लोकल
सकाळच्या 'पीक अवर्स'दरम्यान उत्तर भारतातून मुंबईकडे येणाऱ्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचा उपनगरी रेल्वे मार्गावर प्रवेश तात्पुरता रोखण्यात येत आहे. या लांब पल्ल्याच्या गाड्यांना मुंबईच्या उपनगरात प्रवेश देण्याऐवजी टिटवाळा, आसनगाव, कसारा आदी स्थानकांवर थांबवून ठेवले जात आहे. लोकल गाड्यांचे वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी हा नवा प्रयोग राबवला जात असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
advertisement
मध्य रेल्वे मार्गावर कर्जत, बदलापूर आणि टिटवाळा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने धावणाऱ्या लोकल गाड्या सकाळी मोठ्या प्रमाणात उशिराने पोहोचत आहेत. एसी लोकल सुरू झाल्यानंतर अप मार्गावरील लोकल गाड्यांना तब्बल 30 ते 35 मिनिटांचा विलंब होत असल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
उत्तर भारतातील दाट धुक्यामुळे तिकडून येणाऱ्या मेल-एक्सप्रेस गाड्या चार ते पाच तास उशिराने धावत आहेत. या गाड्या पहाटे पाच वाजण्यापूर्वी उपनगरी मार्गात दाखल होणे अपेक्षित असते. मात्र विलंबामुळे त्या थेट सकाळच्या गर्दीच्या वेळेत मुंबईच्या वेशीवर पोहोचत असल्याने लोकल सेवेवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळेच सकाळचा पीक अवर्स संपेपर्यंत या गाड्यांना उपनगरातच थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
