TRENDING:

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कल्याण- टिटवाळा- अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकल खोळंबल्या; कारण काय?

Last Updated:

मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाली आहे. कल्याण- टिटवाळा- अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकल खोळंबल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: सीएसएमटी- कल्याण मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही वेळेपसून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. मध्य रेल्वेवरील डोंबिवली स्थानकामध्ये सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत झालेली आहे. अप आणि डाऊन अशा दोन्हीही मार्गांवरील ही रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याची माहिती समोर आलेली आहे.
kasara to mumbai local train traffic halted information that the express engine has broken down
kasara to mumbai local train traffic halted information that the express engine has broken down
advertisement

गेल्या 30 मिनिटांपासून उपनगरीय लोकल सेवा विस्कळीत आहे. तर 40 ते 45 मिनिटांपासून लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. कल्याण, टिटवाळा, आसनगाव, कसारा, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत आणि खोपोली या ठिकाणी जाणाऱ्या सर्व लोकलला या सिग्नल यंत्रणेच्या बिघाडाचा फटका झाला आहे. ऐन संध्याकाळच्या वेळेतच हा मध्य रेल्वेचा खोळंबा झाल्यामुळे चाकरमान्यांना आज सुद्धा घरी पोहोचण्यासाठी उशीर होणार आहे.

advertisement

ऐन घरी जाण्याच्या वेळीच लोकलचा खोळंबा झालेला आहे. अप आणि डाऊन अशा दोन्हीही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे. नेमका जलद की धीम्या मार्गावर हा लोकलचा खोळंबा झालेला आहे, याबद्दलच माहिती अद्याप समोर आलेली नाही. लोकलसोबतच लांब पल्ल्यांच्या एक्सप्रेसला सुद्धा सिग्नल यंत्रणेच्या खोळंब्याचा फटका बसल्यामुळे लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. सिग्नल यंत्रणा सुधारणेत 40 ते 45 मिनिट किंवा त्याहून अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: लिंबाचे दर तेजीत, द्राक्षानं मार्केट खाल्लं, कांदा अन् केळीचे दर काय?
सर्व पहा

दरम्यान, गेल्या बुधवारी सुद्धा ऐन संध्याकाळच्या वेळी लोकल वाहतुकीचा खोळंबा झाला होता. मध्य रेल्वेच्या भायखळा ते चिंचपोकळी स्थानकादरम्यान, लोकल सेवा रखडली होती. चिंचपोकळी ते भायखळा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रूळ ओलांडत असताना एका प्रवाशाचा मृत्यू झाल्यामुळे 15 ते 20 मिनिटे लोकलचा खोळंबा झाला होता. तेव्हा सुद्धा नोकरदारांचा ऐन घरी जाण्याच्या वेळेतच लोकलचा खोळंबा झाला होता. दरम्यान, मध्य रेल्वेवरील सतत खोळंब्याचा प्रश्न केव्हा सुटणार ? हा प्रश्न कायमच अनुत्तरितच राहणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कल्याण- टिटवाळा- अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकल खोळंबल्या; कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल