TRENDING:

छगन भुजबळांना मोठा दिलासा, ED च्या आरोपातून अखेर सुटका, 'क्लीन चिट' मिळाली!

Last Updated:

भुजबळांसहीत इतर 40 आरोपींची याचिका मंजूर केली आहे. महाराष्ट्र सदन आणि तळोजा गृहप्रकल्प गैरव्यवहार गुन्हा आधारावर ED ने याचिका दाखल केली होती

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना आता ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) कडून मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र सदन आणि तळोजा गृहप्रकल्प गैरव्यवहार प्रकरणात छगन भुजबळ यांना दोषमुक्त करण्यात आली आहे.  ईडीने दाखल केलेल्या प्रकरणामध्ये आता छगन भुजबळ यांची सुटका झाली आहे. याआधीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भुजबळ यांना क्लिन चिट दिली होती.
News18
News18
advertisement

छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ईडीने PMLA कोर्टात दाखल केलेल्या दाव्यात आता भुजबळ यांची मुक्तता करण्यात आली आहे.   PMLA कोर्ट न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी भुजबळांसहीत इतर 40 आरोपींची याचिका मंजूर केली आहे. महाराष्ट्र सदन आणि तळोजा गृहप्रकल्प गैरव्यवहार गुन्हा आधारावर ED ने याचिका दाखल केली होती. मात्र,मूळ गुन्ह्यात दोषमुक्त झाल्यानं ED दाखल खटल्यात मुक्त करावं अशी मागणी भुजबळ यांच्या वतीने याचिकेत करण्यात आली होती.  आम्हाला दोषमुक्त करा, अशी याचिका दाखल करण्यात आली होती.

advertisement

अखेरीस या प्रकरणी आज PMLA कोर्ट न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी याचिका मंजूर केली. या प्रकरणात छगन भुजबळ यांच्यासह ४० जणांची मुक्तता करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानंतर आता ईडीच्या केसमध्येही भुजबळांची मुक्तता करण्यात आली आहे.  प्रेडिकेट ऑफेन्स नसेल तर ईडीची केसही उभी राहू शकत नाही, या आधारावर कोर्टाने मुक्ताची केली आहे.

advertisement

प्रडिकेट ऑफेन्स नाही, म्हणून भुजबळ सुटले

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
म्हणून सायकल घेऊन निघालो, पुण्याच्या सायकल टूरमध्ये एंट्री करणारे आप्पा आले समोर
सर्व पहा

ईडीने मनी लाँड्रिंगचा आरोप करत भुजबळांविरोधात गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणी याचिकाही दाखल केली होती. पण, याच प्रकरणामध्ये मुक्तता झाली आहे. याचा आधार भुजबळांच्या वकिलांनी कोर्टात याचिका दाखल केली. कोर्टाने प्रडिकेट ऑफेन्स नाही असं नमूद केलं, त्यामुळे ईडीचा खटला हा पुढे चालू शकणार नाही. त्यामुळे या प्रकरणातून भुजबळांची मुक्तता झाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
छगन भुजबळांना मोठा दिलासा, ED च्या आरोपातून अखेर सुटका, 'क्लीन चिट' मिळाली!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल