सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावर मंत्री छगन भुजबळ यांच्यावर अनेक आरोप केले होते. पण आता ईडीने आरोप केलेल्या महाराष्ट्र सदन प्रकरणात भुजबळांची कोर्टाने आरोपातून मुक्तता केली आहे. या प्रकरणी दमानियांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका केली.
"२०१४ पासून जनहित याचिका दाखल केल्यापासून माझा लढा सुरू आहे एकूण ११ घोटाळे आणि त्यातून मिळणारे पैसे यासंदर्भात आम्ही जनहित याचिका दाखल केली होती. तीन गुन्हे दाखल झाले आहे. आतापर्यंत दोन गुन्ह्यांमध्ये दिलासा मिळाला आहे एक गुन्हा बाकी आहे. कोर्टाला योग्य ती माहिती न दिल्यामुळे गुन्हे रद्द केले असतील. मी मुख्य न्यायमूर्तींकडे यासंदर्भात पत्र लिहणार आहे. कलिना सेंट्रल लायब्ररीच प्रकरण प्रलंबित आहे अद्याप भुजबळांना क्लीन चिट नाही, असा दावा दमानियांनी केला.
advertisement
"आत्ता देशाच्या सरन्यायाधीश न्यायवृंद तसंच मुख्यमंत्र्यांनी देखील पत्र लिहिणार आहे. २०१४ पासून जनहित याचिका दाखल केल्यापासून माझा लढा सुरू आहे. एकूण ११ घोटाळे आणि त्यातून मिळणारे पैसे यासंदर्भात आम्ही जनहित याचिका दाखल केली होती. मी या निर्णयावर स्थगित घेण्याची मुंबई उच्च न्यायालयात मागणी करणार आहे' असंही दमानियांनी स्पष्ट केलं.
" सगळे एका माळेचे मणी आहेत. उद्धव ठाकरे सरकारने ३१ मार्च २०२२ ला शासन निर्णय रद्द करण्यासाठी दुसरा शासन निर्णय काढला. एप्रिल २०२३ मध्ये पुन्हा एक शासन निर्णय काढून अपिलमध्ये जाण्याचा शासन निर्णय काढला मात्र महाराष्ट्र सदन घोटाळ्याच प्रकरण अद्याप संपला नाही. सगळ्या सरकारने त्यांना वाचवलं आधी ठाकरेंनी वाचवलं मग फडणवीसांनी वाचवलं, असा आरोपच दमानियांनी केला.
'नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करावे लागणार आहे. सगळे घोटाळे हे देवेंद्र फडणवीस यांनी संपुष्टात आणले यासाठी त्यांना महाराष्ट्र कधी माफ करणार नाही. ईडीच्या आरोपपत्राचे सगळे पुरावे आहेत, प्रत्येकाचा जबाब दिले आहे तरी असा निर्णय आला हे दुर्दैवी आहे. भाजपचे ही मोडस ऑपरेंडी आहे. आधी आरोप करा त्यांच्या मागे तपास यंत्रणा लावा आणि फडणवीस यांनी भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राचा जरा दिला होता आणि आज हेच फडणवीस सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना घेऊन पुढे जात आहेत आता कित्येक पटींनी लूट सुरू आहे. फडणवीस यांनी महाराष्ट्राला याच उत्तर द्यावं. सध्या राज्यात केवळ बोली लावण्याचं राजकारण सुरू आहे, अशी टीकाही दमानियांनी केली.
