TRENDING:

LPG Crisis : गॅस संपला तरी चिंता नको! सिलेंडर पुरवठ्याबाबत सरकारचा मोठा निर्णय; पेट्रोल पंपावर...

Last Updated:

Gas Shortage : गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे स्वयंपाकासाठी इंधनाच्या कमतरतेचा सामना करणाऱ्या कुटुंबांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आखाती देशांमध्ये युद्ध सुरु असून त्याचा परिमाण गेल्या काही दिवसांपासून भारतातही दिसू लागलेला आहे. युद्धामुळे सध्या गॅस टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याचे चित्र असून गॅस मिळवण्यासाठी गॅस केंद्राबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा दिसून येतात.आता राज्य सरकाने या तुटवड्यावर तोडगा काढण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
इंधन टंचाईवर मात करण्यासाठी पेट्रोल पंपांवर केरोसिन उपलब्ध होणार.
इंधन टंचाईवर मात करण्यासाठी पेट्रोल पंपांवर केरोसिन उपलब्ध होणार.
advertisement

स्वयंपाकासाठी नवा पर्याय!

या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने केरोसिनचा वापर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर केरोसिन उपलब्ध करुन देण्याची तयारी सुरु असल्याची माहितीही राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानपरिषदेत दिली.

नेमके काय म्हणाले भुजबळ?

गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळं अनेक शहरात हॉटेल्स शिवाय लहान खाद्य व्यवसायही अचडणी आलेले असून नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारकडून बाजारात मोठ्या प्रमाणावर केरोसिन उपलब्ध करुन देण्याची योजन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यानुसार लवकरच पेट्रोल पंपांवर आता केरोसिन मिळणार आहे शिवाय एलपीजी गॅस पुरवठ्याबाबतही नागरिकांनी कोणतीही काळजी करु नये असेही आवाहन त्यांनी केलेले आहे.

advertisement

एलपीजी गॅस तुटवडा संपणार?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षला 12000 रुपये भाव, लिंबू दरही तेजीत, कांद्याची काय स्थिती? Video
सर्व पहा

मंत्री छगन भुजबळ यांनी विधानपरिषजेद एलपीजी गॅस तुटवड्याबाबतही माहिती दिली. ज्यात त्यांनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या सर्व पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रतिनिधींची चर्चा केली आणि राज्यातील जे घरगुती एलपीजीचे दररोजचे उत्पादन 9000 मेट्रिक टन होते ते आता 11,000 मेट्रिक टनांपर्यंत वाढविण्याची माहिती दिलेली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात एलपीजी उत्पादनात येणाऱ्या अडचणी दूर होतील.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
LPG Crisis : गॅस संपला तरी चिंता नको! सिलेंडर पुरवठ्याबाबत सरकारचा मोठा निर्णय; पेट्रोल पंपावर...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल