फक्त 22 लाखात नवी मुंबईत मालक व्हा
सिडकोने तळोजा आणि खारघर पूर्व परिसरातील प्राईम लोकेशनवर घरांची लॉटरी जाहीर केली आहे. या योजनेत घरांची किंमत फक्त 22.6 लाख रुपयांपासून सुरू होत आहे.
या घरांसाठी तळोजा-खारघर पूर्व सेक्टर 28, 37 आणि 39 या भागात प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यामुळे नवी मुंबईत परवडणाऱ्या दरात घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.
advertisement
प्रकल्पाजवळ कनेक्टिव्हिटीचे जाळे
या प्रकल्पाला उत्तम कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. तळोजा पांचनंद रेल्वे स्टेशन, बेलापूर-पेंधर मेट्रो लाईन-1 तसेच आगामी मेट्रो लाईन 12 आणि प्रस्तावित लाईन 2 यामुळे या परिसरातून प्रवास करणे सोपे होणार आहे. याशिवाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळही या प्रकल्पाजवळ असल्यामुळे भविष्यात या परिसराचे महत्त्व आणखी वाढणार आहे.
परिसरात उद्याने, रुग्णालये आणि शाळा जवळ असल्याने कुटुंबासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध राहणार आहेत. तसेच तळोजा-खारघर उड्डाणपूलमुळे वाहतूकही सुलभ होणार आहे. सिडकोकडून मजबूत बांधकाम आणि प्रशस्त मोकळी जागा यावर विशेष भर देण्यात आला आहे.
अर्ज अन् नोंदणी कधीपर्यंत येणार करता?
या योजनेसाठी इच्छुक नागरिकांनी cidcohomes.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन नोंदणी करावी. अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 मार्च 2026 आहे. विशेष म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) 2.5 लाख रुपयांपर्यंत अनुदानही उपलब्ध आहे. त्यामुळे परवडणाऱ्या दरात घर घेण्याची ही उत्तम संधी आहे.
