TRENDING:

मुख्यमंत्र्यांचे तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश, पण ट्वीटमध्ये चाकणकरांकडून वेगळाच मुद्दा, म्हणाल्या...

Last Updated:

आज रुपाली चाकणकर यांनी  मुंबई पोलीस महासंचलकांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणकर यांना तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना चांगलंच महागात पडलं आहे. रुपाली चाकणकर याांच्या यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांना तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिले. पण, रुपाली चाकणकर यांनी पोलीस महासंचालकांच्या भेटीनंतर ट्वीट केलं आहे, त्या ट्वीटची चर्चा रंगली आहे.
News18
News18
advertisement

महिला अत्याचार प्रकरणी कॅप्टन अशोक खरातचे काळे कृत्य समोर आल्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. अशातच  अशोक खरात याचे पाय धुताना आणि सोबत असतानाचे रुपाली चाकणकर यांचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर या पुरत्या अडचणीत सापडल्या आहे.  आज रुपाली चाकणकर यांनी  मुंबई पोलीस महासंचलकांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणकर यांना तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिले आहे. पण चाकणकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये राजीनाम्याचा उल्लेखच केला नाही.

advertisement

advertisement

"आज मुंबई येथे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेत त्यांना राज्य महिला आयोगाच्या वतीने पत्र दिलं. या पत्रात अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणाचा सखोल आणि वस्तुनिष्ठ तपास व्हावा तसंच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करत या प्रकरणातील सत्यता बाहेर यावी, आरोपीवर कारवाई होण्याकरता आपल्या स्तरावरून निर्देश देण्याबाबत सांगितले' अशी माहिती चाकणकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये दिली.

advertisement

रुपाली चाकणकर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेण्याची शक्यता

दरम्यान, पोलीस महासंचानक सदानंद दाते यांची भेट घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणकर यांना तातडीने राजीनामा देण्याचे आदेश दिले आहे. मुंबईत भेट घेतल्यानंतर चाकणकर सध्या पुण्याला रवाना झाल्या आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

advertisement

रुपाली चाकणकर यांनी पत्रात काय म्हटलं? 

प्रति,

श्री. सदानंद दाते,

पोलीस महासंचालक,

पोलीस महासंचालक कार्यालय,

शहीद भगतसिंग मार्ग,

कुलाबा, मुंबई – ४००००१.

विषय: नाशिक येथील अशोक खरात (कॅप्टन) याच्यावर दाखल बलात्कार प्रकरणाची स्थापित विशेष तपास पथक (SIT) मार्फत सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याबाबत.

संदर्भ: नाशिक शहर, सरकारवाडा पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हा क्र.७४/२०२६, कलम क्र. ६४, ७४ व ३५१ भारतीय न्याय संहिता व अंधश्रद्धा निर्मुलन अधिनियम कलम ३(२) (१) नुसार.

महोदय,

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, १९९३ नुसार करण्यात आली आहे. सदर अधिनियमाच्या कलम १० अन्वये आयोगाची कर्तव्ये निश्चित करण्यात आलेली आहेत. भारतीय संविधानाने महिलांना दिलेल्या संरक्षणात्मक अधिकारांच्या अनुषंगाने विविध विषयांवर सखोल कामकाज करण्याची जबाबदारी आयोगावर सोपविण्यात आलेली आहे. तसेच संविधान व इतर कायद्यांमधील महिलांना बाधक ठरणाऱ्या तरतुदींचा वेळोवेळी आढावा घेणे व त्यातील उणिवा, अपूर्णता किंवा दोष दूर करण्यासाठी सुधारात्मक उपाययोजना सुचविण्याचे अधिकार आयोगास प्रदान करण्यात आलेले आहेत.

उपरोक्त विषयास अनुसरून, नाशिक येथील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात (कॅप्टन) याने एका ३५ वर्षीय महिलेवर गेल्या तीन वर्षांपासून वारंवार बलात्कार केल्याची आणि तिला धमकावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडे ५८ हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याची माहिती प्रसारमाध्यमांतून प्राप्त झाली आहे.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग या घटनेची अत्यंत गांभीर्याने दखल घेत आहे. सदर प्रकरण हे केवळ एका महिलेपुरते मर्यादित नसून, आरोपीने श्रद्धेचा गैरफायदा घेऊन अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता, राज्य शासनाने या तपासासाठी SIT (विशेष तपास पथक) नियुक्त केले आहे. आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास निष्पक्ष व लवकरात लवकर होईल याची मला खात्री आहे. महिला आयोगाच्या वतीने आपणास कळविते की,

१. प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी : आरोपीचे समाजातील विविध स्तरांतील लोकांशी असलेले संबंध पाहता, तपासावर कोणताही राजकीय किंवा बाह्य दबाव येणार नाही याची दक्षता घेऊन स्थापित विशेष तपास पथक (SIT) ने निष्पक्षपातीपणे तपास करावा.

२. पीडितांचे संरक्षण : सापडलेल्या ५८ व्हिडिओंमधील पीडित महिलांची ओळख गुप्त ठेवून त्यांना तक्रार देण्यासाठी विश्वासात घेण्यात यावे आणि त्यांना आवश्यक पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे.

३. कठोर कायदेशीर कारवाई : आरोपीने जर डिजिटल पुरावे (व्हिडिओ) ब्लॅकमेलिंगसाठी वापरले असतील, तर त्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत (IT Act) वाढीव कलमे लावून कडक कारवाई करण्यात यावी.

४. कालबद्ध तपास : सदर प्रकरणाचा तपास ठराविक कालमर्यादेत पूर्ण करून दोषारोपपत्र (Charge sheet) लवकरात लवकर न्यायालयात सादर करण्यात यावे, जेणेकरून पीडित महिलांना न्याय मिळेल.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग या संपूर्ण प्रकरणाच्या तपासावर लक्ष ठेवून आहे. या प्रकरणाचा प्रगती अहवाल वेळोवेळी आयोगाला सादर करण्यास पोलीस आयुक्त नाशिक यांना कळवावे, ही विनंती.

आपली,

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: लिंबाचे दर तेजीत, द्राक्षानं मार्केट खाल्लं, कांदा अन् केळीचे दर काय?
सर्व पहा

(रुपाली चाकणकर)

मराठी बातम्या/मुंबई/
मुख्यमंत्र्यांचे तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश, पण ट्वीटमध्ये चाकणकरांकडून वेगळाच मुद्दा, म्हणाल्या...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल