TRENDING:

Mumbai News: फुटपाथ अडवणाऱ्यांवर मुंबई पालिकेची कडक कारवाई, कांदिवलीत 'करेक्ट कार्यक्रम'

Last Updated:

कांदिवलीमध्ये फेरीवाल्यांनी महापालिका अधिकाऱ्यांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी आज बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांनी घटनास्थळी भेट दिली. भेट देत आयुक्तांनी अनधिकृत फेरीवाल्यांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: कांदिवलीतील आर/ दक्षिणचे एक पथक लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरामध्ये कारवाई करण्यासाठी गेले होते. यावेळी कारवाई दरम्यान फेरीवाल्यांनी महापालिका अधिकाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीमध्ये बीएमसीने पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आज या प्रकरणी बीएमसीचे आयुक्त भूषण गगरानी यांनी प्रत्यक्ष जाऊन घटनास्थळी भेट दिली आहे. भेट देत आयुक्तांनी अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. सोबतच वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या दुकानांवरही कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
News18
News18
advertisement

यावेळी आयुक्तांनी घटनास्थळी आणि फेरीवाल्यांनी ज्या अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केला त्यांची सुद्धा भेट घेतली. भेटीदरम्यानच आयुक्तांनी अनधिकृत फेरीवाल्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे महापालिका कर्मचाऱ्यांना निदर्शे दिले. बीएमसी क्षेत्रामध्ये फुटपाथवर बसणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर आणि फुटपाथवर नागरिकांची वाट अडवणाऱ्या दुकानदारांंवर सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिलेले आहेत. कायमच बीएमसी क्षेत्रामध्ये फेरीवाल्यांवर आणि अनधिकृत दुकानदारांवर कारवाई केली जाते. परंतु कांदिवलीमध्ये घडलेल्या घटनेमुळे पुन्हा एकदा महापालिका ॲक्टिव्ह मोडवर आलेली पाहायला मिळत आहे.

advertisement

नेमकं प्रकरण काय?

कांदिवलीतील विश्वकर्मण्ये चौक (लोखंडवाला सर्कल) परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर बीएमसीच्या आर (दक्षिण) विभागाकडून काल (शनिवार- 7 मार्च) निष्कासनाची कारवाई करण्यात आली. महापालिका कर्मचाऱ्यांकडून आणि अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जात असताना जमावाकडून त्यांना मारहाण करण्यात आली. इतकंच नाही तर, फेरीवाल्यांकडून संयंत्रे आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर, बीएमसीचे आयुक्त भूषण गगराणी यांनी आज (रविवार- 8 मार्च) कांदिवलीतील विश्वकर्मण्ये चौक (लोखंडवाला सर्कल) परिसरात भेट देऊन पाहणी केली. रस्त्यावर उभी करण्यात आलेली वाहने, फेरीवाल्यांमुळे आणि अनधिकृत दुकानदारांमुळे फुटपाथवर निर्माण होत असलेले अडथळे हे महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी प्रत्यक्ष उभे राहून निष्कासित करण्याचे आदेश दिले. सोबतच, फुड डिलिव्हरी करणाऱ्या दुचाकी उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या पिझ्झा दुकानाला तात्काळ बंद करण्याचेही निर्देश दिले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बारावीत दोनदा नापास, 7 वर्षे ड्रायव्हिंग, शेतकऱ्याच्या लेकानं ठरवलं, झाला फौजदार
सर्व पहा

यावेळी आयुक्तांनी धडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अडथळे निर्माण करणाऱ्या गोष्टींवर कारवाई करण्याचे आदेश यावेळी आयुक्तांनी दिले आहेत. फुटपाथवरून ये- जा करण्यासाठी नागरिकांना बऱ्याच वेळा अडथळा निर्माण होतो. यामुळे आता नागरिकांना फुटपाथवरून ये- जा करण्यासाठी अडथळा निर्माण करणाऱ्या अनधिकृत फेरीवाले आणि फुटपाथवर अनधिकृतपणे बांधकाम करून दुकान उभारणाऱ्यांविरोधात कायमच निष्कासनाची कारवाई सुरूच राहील, असे देखील आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: फुटपाथ अडवणाऱ्यांवर मुंबई पालिकेची कडक कारवाई, कांदिवलीत 'करेक्ट कार्यक्रम'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल