रेल्वे वेळापत्रकात मोठा फेरबदल
मिळालेल्या माहितीनुसार, दादर-तिरुनेलवेल्ली-दादर साप्ताहिक ही गाडी दादरऐवजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणार आहे आणि परतीच्या प्रवासातही शेवटचे स्थानक लोकमान्य टिळक टर्मिनसच असेल.
जाणून घ्या गाडीची वेळ
गाडी क्रमांक 22629 (लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुनेलवेल्ली) दर गुरुवारी रात्री 8.45 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसवरून रवाना होईल. ही गाडी रात्री 9.02 वाजता ठाणे स्थानकावर पोहोचेल आणि 9.05 वाजता पुढे जाईल. तिरुनेलवेल्ली येथे ही गाडी शनिवारी पहाटे 3.55 वाजता पोहोचणार आहे.
advertisement
परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 22630 तिरुनेलवेल्ली येथून दर बुधवारी सकाळी 7.30 वाजता सुटेल आणि गुरुवारी दुपारी 3.00 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
बदल कधी पासून लागू होणार?
हा बदल गाडी क्रमांक 22630 साठी 15 एप्रिल 2026 पासून आणि गाडी क्रमांक 22629 साठी 16 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे. पनवेल ते तिरुनेलवेल्ली या मार्गावरील इतर स्थानकांच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रवाशांनी नव्या टर्मिनसची नोंद घेऊन नियोजन करावे असे आवाहन कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी केले आहे.
