12 अंकी नंबर असलेलं कार्ड विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहे. 31 जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांच्या आधारकार्डवरील नाव आणि शैक्षणिक नोंदीतील नाव एकासारखे आहे का हे तपासून ओळखपत्र बनवून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. दररोज अपार आयडी काढण्याच्या सूचना प्राथमिक आणि शिक्षण अधिकार्यांना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अपार आयडी फायदेशीर असून त्यांची गुणपत्रिका, प्रमाणपत्रे एकाच ठिकाणी डिजिटल स्वरुपात मिळणार असल्याने कागदपत्रे गहाळ होण्याची भीतीही नाही.
advertisement
अपार आयडी म्हणजे काय?
अपार आयडी म्हणजे 'ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री' (Automated Permanent Academic Account Registry) आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारित हा उपक्रम येत असून प्रत्येक विद्यार्थ्याला 12 अंकी युनिक नंबर मिळतो. तो नंबर म्हणजेच, अपार आयडीची तुमची ओळख असते. अपार आयडीवर विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, गुण आणि पुरस्कार एकाच ठिकाणी डिजिटल स्वरूपात साठवतो आणि 'एक राष्ट्र, एक विद्यार्थी आयडी' या संकल्पनेवर आधारित आहे, जसे आधारकार्ड असते. अपार आयडी बनवण्यासाठी पालकांची संमती आवश्यक असते.
अपार आयडी कसा बनवायचा?
apaar.education.gov.in या अधिकृत वेबसाइटला विद्यार्थ्यांना भेट द्यावी लागेल. जिथे त्यांना नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि पासवर्डने लॉगिन करावं लागेल किंवा नवीन नोंदणी करावं लागेल. लॉगिन झाल्यानंतर 'Download APAAR ID' पर्यायावर क्लिक करून किंवा डिजिलॉकर (DigiLocker) मध्ये जाऊन तुम्ही तुमचा आयडी मिळवू शकता, यासाठी UDISE युनिक स्टुडंट आयडेंटिफायर (PEN), नाव, जन्मतारीख, लिंग, मोबाइल नंबर, आई-वडिलांचे नाव आणि आधार क्रमांक यांसारखी माहिती आवश्यक आहे. आतापर्यंत 14 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अपार आयडी बनवला आहे.
अपार आयडीचे फायदे
11वी च्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया आहे. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 10 महाविद्यालयांना प्राधान्य देता येते. विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांनुसार त्यांनी निवडलेल्या प्राधान्यक्रमानुसार महाविद्यालये मिळतात आणि प्रवेश निश्चित केले जातात. विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता जास्त धावाधाव करावी लागत नाही. इयत्ता १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता विविध शिष्यवृत्ती आणि योजनांचा लाभ दिला जातो. डिजिटल मार्कशीट आणि सर्टिफिकेट मिळवण्यासाठी अपार आयडी आवश्यक आहे. याचा उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदी एकाच ठिकाणी डिजिटल स्वरूपात ठेवणे आहे, जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (एनईपी 2020) नुसार आहे.
