उत्साही कार्यकर्त्यांनी मंत्री उदय सामंत आल्यानं मोठ्या आनंदाने फटाके फोडले. यावेळी एक फटका सामंत यांच्या पायाजवळच फुटला, ज्यामुळे आग लागली. मात्र, प्रसंगावधान राखत सुरक्षा रक्षकांनी त्यांना आगीपासून दूर नेत वाचवलं. ते गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत जात असताना अचानक फटाके फोडल्यामुळे ही घटना घडली. सुरक्षा रक्षकांनी लगेच त्यांना बाजूला केल्यानं मोठा अनर्थ टळला.
advertisement
त्यांच्या पायाजवळ एका फटाक्याचा स्फोट झाला आणि आग भडकली. यामुळे काही क्षणांसाठी गोंधळ निर्माण झाला. या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मंत्री उदय सामंत गणेशोत्सवानिमित्ताने कार्यकर्त्यांच्या घरी, सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणरायाच्या दर्शनासाठी जात आहेत. गुरुवारी रात्री वांद्रे इथे ते दर्शनासाठी गेले असताना हा प्रसंग घडला. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
गणेशोत्सवानिमित्त खार ईस्ट येथील खारचा महाराजा मंडळाला भेट दिली. यावेळी श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. गणपती बाप्पाच्या चरणी महाराष्ट्रातील जनतेच्या सुख-समृद्धी, प्रगती आणि आरोग्यसंपन्न आयुष्याची प्रार्थना केली. या प्रसंगी शिवसेनेचे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गणेश भक्त उपस्थित होते अशी उदय सामंत यांनी रात्री ट्विट करुन माहिती दिली.