मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसचे हे पाच माजी नगरसेवक आज चार वाजता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या धारावी मतदारसंघातील तीन माजी नगरसेवकांचा यामध्ये समावेश आहे. वर्षा गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन हे माजी नगरसेवक पक्ष सोडत असल्याची माहिती समोर येत आहे.
शिवसेनेत प्रवेश करणारे काँग्रेसचे माजी नगरसेवक
advertisement
१) पुष्पा कोळी- सायन
२) वाजीद कुरेशी- चांदीवली
३) भास्कर शेट्टी- धारावी
४) बब्बू खान- धारावी
५) गंगा कुणाल माने - धारावी
ठाकरे गटालाही बसणार धक्का
दरम्यान दुसरीकडे काँग्रेस पाठोपाठ आजच शिवसेना ठाकरे गटाला देखील मोठा धक्का बसणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील माजी आमदारांची सून आणि माजी नगरसेविका ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.