TRENDING:

Shocking Incident : महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या डब्यात चिमुकल्याचा रडण्याचा आवाज, प्रवाशांनी शौचालयात पाहिलं तर..., भयंकर प्रकाराने पळापळ

Last Updated:

Mahalaxmi Express Accident : जर तुम्हीही लहान मुलांना घेऊन ट्रेनमधून प्रवास करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा. मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या महालक्ष्मी ट्रेनमध्ये एक विचित्र पण तितकाच धक्कादायक प्रकार घडलेला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : धावत्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील शौचालयात चार वर्षांच्या चिमुकल्याचा पाय अडकल्याची धक्कादायक घटना घडली. मुंबईहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या एस-2 डब्यात हा प्रकार झाला. अचानक झालेल्या या घटनेमुळे डब्यात आणि संपूर्ण गाडीत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
four year old child stuck in train toilet in Maharashtra
four year old child stuck in train toilet in Maharashtra
advertisement

शौचालयातून लहान मुलाचा आक्रोश ऐकला अन्

मुंबई येथे राहणारे महेंद्र कदर हे 4 फेब्रुवारी रोजी आपल्या कुटुंबासह महालक्ष्मी एक्स्प्रेसने प्रवास करत होते. गाडी कर्जत रेल्वे स्थानकाजवळ येत असताना शौचालयातून एका लहान मुलाचा जोरजोरात रडण्याचा आवाज त्यांना ऐकू आला. त्यांनी तात्काळ शौचालयाकडे धाव घेतली असता त्यांच्या चार वर्षीय मुलाचा पाय शौचकुपात अडकल्याचे लक्षात आले.

advertisement

वडिलांनी आणि इतर प्रवाशांनी मिळून मुलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र पाय घट्ट अडकल्यामुळे हे प्रयत्न अपयशी ठरले. अखेर गाडी कर्जत स्थानकात पोहोचताच लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे प्रशासनाला याची माहिती देण्यात आली.

शौचकुप कापून मुलाची सुटका

रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने परिस्थिती हाताळत शौचालयातील पॅनल कटरच्या मदतीने कापला. काही वेळाच्या प्रयत्नानंतर चिमुकल्याची सुखरूप सुटका करण्यात आली. या संपूर्ण घटनेत मुलाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणे-मुंबईचा नाद सोडला अन् गाव गाठलं, अर्ध्या एकरात केली शेती, 3 महिन्यात लखपती
सर्व पहा

मात्र या घटनेमुळे महालक्ष्मी एक्स्प्रेस जवळपास एक तास थांबून राहिली, त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. घटनेनंतर आवश्यक कार्यवाही पूर्ण करून गाडी पुन्हा मार्गस्थ करण्यात आली.

मराठी बातम्या/मुंबई/
Shocking Incident : महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या डब्यात चिमुकल्याचा रडण्याचा आवाज, प्रवाशांनी शौचालयात पाहिलं तर..., भयंकर प्रकाराने पळापळ
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल