नवी मुंबईतील नेरुळ रेल्वे स्टेशन समोरील फुटपाथवर राहणाऱ्या 4 वर्षांच्या लहान मुलीचं एका व्यक्तीने अपहरण केलं. त्याने खाऊचं आमिष देऊन तिचं अपहरण केलं. यानंतर मुलीला घेऊन परराज्यात पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला नेरुळ पोलिसांनी 48 तासाच्या आत अटक केली आणि 4 वर्षीय मुलीची सुटका केली आहे.
लग्नाला 2 वर्ष झालेले; अचानक पतीने पाठवला दुसऱ्या पत्नीचा फोटो, महिलेचं धक्कादायक पाऊल
advertisement
74 वर्षीय मणी थॉमस असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. नेरुळ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपीचा माग काढत त्याला करावे गावातून जेरबंद केलं आहे. आरोपी हा अपहरण केलेल्या मुलीला परराज्यात नेऊन विकण्याच्या तयारीत असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अपहरण झालेल्या 4 वर्षीय मुलीला नेरुळ पोलिसांनी शोधून काढलं आणि तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन केलं.
या घटनेनंतर या मुलीच्या पालकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. पोलिसांनी 48 तासात 150 सीसीटीव्ही फुटेज तपासत या मुलीला आरोपीच्या तावडीतून वाचवलं आहे.
