लग्नाला 2 वर्ष झालेले; अचानक पतीने पाठवला दुसऱ्या पत्नीचा फोटो, महिलेचं धक्कादायक पाऊल
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
दोन वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला. मात्र, पुढे कौटुंबिक कलह सुरू झाले. यामुळे ती आपल्या माहेरी राहात होती
छत्रपती संभाजीनगर 28 सप्टेंबर : पती-पत्नीचं नातं हे अतिशय खास आणि वेगळं असतं. एकमेकांच्या प्रत्येक सुख-दुःखात ते सोबत असतात. एकमेकांची आयुष्यभर साथ देण्याचं वचन ते देतात. मात्र, अनेकदा हे नातं अतिशय विचित्र वळणावर जाऊन पोहोचतं. सततच्या वादातून पुढे असं काहीतरी घडतं, जे फक्त हे नातंच संपवत नाही तर दोन्हीतल्या एकाचा जीवही जातो.
सध्या असंच एक हादरवणारं प्रकरण समोर आलं आहे. यात 25 वर्षीय तरुणीने आपली जीवनयात्रा संपवली. 25 वर्षीय शेख अहेशा परवीन शेख अलमगीर हिने फिजिओथेरपीचे शिक्षण घेतलं होतं. दोन वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला. मात्र, पुढे कौटुंबिक कलह सुरू झाले. यामुळे ती आपल्या माहेरी राहात होती. यादरम्यान अचानक एक दिवस तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.
advertisement
मंगळवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास या तरुणीने टोकाचं पाऊल उचललं. याबाबत बोलताना तिच्या वडिलांनी सांगितलं, की कौटुंबिक वाद न्यायप्रविष्ट असताना महिलेच्या पतीने तिला आपल्या दुसऱ्या पत्नीचे फोटो पाठवले होते. याच तणावातूनच तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
पतीने दुसऱ्या पत्नीचे फोटो मोबाईलवर पाठवल्यानंतर तणावाखाली येऊन तरुणीने आत्महत्या केल्याचा तिच्या कुटुंबाचा आरोप आहे. मात्र, कुटुंबाचा जबाब नोंदवल्यानंतर आत्महत्येचं नेमकं कारण समोर येईल, असं तपास अधिकारी हेड कॉन्स्टेबल बबन शिंदे यांनी सांगितलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 28, 2023 11:04 AM IST
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
लग्नाला 2 वर्ष झालेले; अचानक पतीने पाठवला दुसऱ्या पत्नीचा फोटो, महिलेचं धक्कादायक पाऊल


