मुस्लिम तरुणाची अनोखी गणेशभक्ती, 20 वर्षांपासून करतोय बाप्पाची सेवा
सात दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनानंतर कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या दरम्यान गणेश भक्तांसाठी मध्य रेल्वेने अतिरिक्त 22 लोकल फेऱ्या रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय पश्चिम रेल्वेवरही अतिरिक्त 12 लोकल फेऱ्या रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कल्याण- सीएसएमटी विशेष लोकल कल्याणहून मध्यरात्री 12:05 वाजता सुटून 01:30 वाजता सीएसएमटीला पोहोचेल. ठाणे- सीएसएमटी विशेष लोकल ठाण्याहून मध्यरात्री 1 वाजता सुटून रात्री 2 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
advertisement
मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास होणार सुसाट, गणेशभक्तांच्या प्रवासात नसणार विघ्न!
सीएसएमटी- कल्याण मार्गावर विशेष लोकल सीएसएमटीहून रात्री 01:40 वाजता सुटेल आणि कल्याणला रात्री 03:10 वाजता पोहोचेल. सीएसएमटी- ठाणे विशेष लोकल सीएसएमटीहून रात्री 02:30 वाजता सुटेल आणि रात्री 03:30 वाजता ठाण्याला पोहोचेल. तर ठाण्याहून दुसरी ट्रेन रात्री 2 वाजता लोकल सुटेल आणि रात्री 3 वाजता सीएसएमटीला पोहोचेल. त्यानंतर सीएसएमटी-कल्याण विशेष लोकल सीएसएमटीहून रात्री 03:25 वाजता सुटेल आणि कल्याणमध्ये पहाटे 04:55 वाजता पोहोचेल. पश्चिम रेल्वे शनिवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी सहा लोकल चालविणार आहे. त्यानुसार चचर्गेटहून विरारसाठी रात्री 01:15, 01:45, 02:15, 02:45, 03:15 आणि 03:45 वाजता लोकल सुटेल. परतीच्या मार्गावर विरारहून चर्चगेटसाठी रात्री 12:15, 12:30, 01:00, 01:30, 02 आणि रात्री 03 वाजता लोकल सुटेल.
कोकणी खाजा अन् लाडूंची कमाल, सिंधुदुर्गचा तरुण करतोय 80 लाखांची उलाढाल
अनंत चतुर्दशीच्या रात्री हार्बर मार्गावर चार विशेष लोकल
अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने हार्बर मार्गावरून सीएसएमटीवरून रात्री 01:30 वाजता विशेष लोकल सुटेल आणि पनवेल येथे रात्री 02:50 वाजता पोहोचेल. सीएसएमटीहून रात्री 02:45 वाजता लोकल सुटेल आणि पनवेलला पहाटे 04:05 वाजता पोहोचेल. पनवेलहून रात्री 1 वाजता विशेष लोकल सुटेल आणि रात्री 02:20 वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. पनवेलवरून रात्री 01:45 वाजता लोकल सुटून सीएसएमटीला रात्री 03:05 वाजता पोहोचेल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.