सरकारी नोकरीच्या तयारीत असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या BEML (भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड) या मल्टी टेक्नोलॉजी कंपनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
बीईएमएल ही एक नामांकित सरकारी कंपनी असून येथे काम करण्याची संधी मिळणे हे अनेक उमेदवारांचे स्वप्न असते. BEML कंपनीने एचआर विभागात भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत ऑफिसर असिस्टंट (एचआर – ग्रेड II) आणि असिस्टंट मॅनेजर (एचआर – ग्रेड III) या पदांसाठी एकूण २२ जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे एचआर क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे.
advertisement
जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन असून इच्छुक उमेदवारांनी BEML च्या अधिकृत वेबसाइट bemlindia.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी 2026 आहे. त्यामुळे उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे
वयोमर्यादेबाबत बोलायचे झाल्यास ऑफिसर असिस्टंट पदासाठी उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 29 वर्षे असावे तर असिस्टंट मॅनेजर (एचआर) पदासाठी वयोमर्यादा 30 वर्षे ठेवण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 40,000 रुपयांपासून ते 1,60,000 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.
शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी घेतलेली असावी. यासोबतच फुल टाईम एमबीए (एचआर ,आयआर) किंवा पर्सनल मॅनेजमेंट आणि इंडस्ट्रियल रिलेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री किंवा डिप्लोमा आवश्यक आहे. ऑफिसर पदासाठी किमान 2 वर्षांचा अनुभव तर असिस्टंट मॅनेजर पदासाठी किमान 4 वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक आहे.
