शिरोडी खुर्द येथे बाळकृष्ण आटोळे यांनी झेंडू झाडांची 13 ऑगस्ट 2025 रोजी झेंडू फुलाची लागवड केली. याबरोबरच विविध प्रकारच्या फुलांची लागवड दरवर्षी केली जाते. या फुलांच्या झाडांसाठी पाणी ठिबकद्वारे देण्यात येते. तसेच या झाडांवर अळी किंवा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचा वापर करावा लागतो. तरुण शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग केले पाहिजेत आणि फुलशेतीकडे यायला काहीच हरकत नाही, कारण की या शेतीमध्ये मेहनत घेतल्यास व योग्य नियोजन केल्यास उत्पन्न चांगले मिळते.
advertisement
पारंपारिक पिकातील मका, कापूस, सोयाबीन या पिकांपेक्षा फुलशेती फायदेशीर आहे. या शेतीतून बाजारात गेल्यानंतर दररोज पैसे मिळतात. आमच्या शेतातील झेंडू फुले छत्रपती संभाजीनगर बाजारात विक्री केली जातात, तसेच जास्त उत्पादन राहिल्यास जळगाव, पुणे यांसारख्या ठिकाणी पार्सलद्वारे विक्री केली जाते. या पिकातून आणखी दीड ते दोन महिने उत्पादन घेता येईल, असे एकूण 4 महिन्यात 1.50 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळेल, असे देखील आटोळे यांनी म्हटले आहे.





