खरं तर मुंबईप्रमाणे वसई विरारला महापौर निवडणुकीसाठी
सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण मिळाले होते.या आरक्षणावर आता हितेंद्र ठाकूर यांनी आपली भूमिका मांडली आहे. मुंबईच्या व वसई विरार च्या महापौरपदाच्या आरक्षण सोडतीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.आरक्षण सोडतीचा कारभार चुकीचा असून, हे नियम विशिष्ट समाजावर अन्याय करणारे असल्याचा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. यावेळी ST महिला आरक्षण पडेल, अशी अपेक्षा होती, मात्र तसे न झाल्याचेही त्यांनी नमूद केले. जनरल जागेवर ST प्रवर्गातून उमेदवारी दिल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
advertisement
तसेच आरक्षण सोडतीवर सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे, असे वाटत नाही. पण नियम चुकीचे आहेत. दबावाचे कसं काय असू शकेल शेवटी लोकांसमोर चिठ्ठ्या पडल्या आहेत,असे देखील हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. वसई विरार महानगरपालिकेसाठी बहुजन विकास आघाडीत अनेक दिग्गज निवडून आले आहेत. महापौरपदासाठी अनेक सक्षम चेहरे उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्वजण बसून निर्णय घेऊ, असे हितेंद्र ठाकूर म्हणाले आहेत.
दरम्यान, पालिकेत आमच्या पक्षाचे स्पष्ट बहुमत असताना, बॉडीचा विचार न करता सफाई कामगारांचा ठेका काढून घेण्यात आला, ही बाब चुकीची असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले. या सर्व मुद्द्यांमुळे वसई-विरारच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
आरक्षणावर ठाकरेंची भूमिका काय?
मागील दोन महापौर खुल्या वर्गातील होते. त्यामुळे नव्या महापौरांची निवड इतर मागासवर्गीय (ओबीसी) किंवा अनुसूचित जमाती (एसटी) वर्गातून व्हायला हवी होती. ज्या पद्धतीने ही प्रक्रिया राबविण्यात आली,त्याचा आम्ही निषेध करतो असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.
