TRENDING:

Mumbai News : पेट्रोल-डिझेल 50 दिवस पुरेल, पण सीएनजीचे काय? मुंबईकर चिंतेत

Last Updated:

CNG Supply Shortage : मुंबई शहरातील वाहन चालकांसाठी येत्या काही दिवसांत वाहन घरीच ठेवून बाहेर पडण्याची वेळ येणार आहे. नेमका हा परिणाम कशामुळे होऊ शकतो ते जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून इराण-अमेरिका युद्ध हे सुरु आहे. या युद्धाच्या तणावामुळे इंधन पुरवठ्यात अनिश्चितता निर्माण झाली असून त्याचे थेट परिणाम भारतातही जाणवत आहेत. गॅस टंचाईपाठोपाठ आता मुंबईतही सीएनजीचा तुटवडा भासू लागला आहे. यामुळे वाहनचालक आणि सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून इंधन पुरवठ्याबाबत मोठी टांगती तलवार निर्माण झाली आहे.
५० दिवस पुरेल इतके पेट्रोल-डिझेल शिल्लक मुंबईत
५० दिवस पुरेल इतके पेट्रोल-डिझेल शिल्लक मुंबईत
advertisement

मुंबईवर इंधन संकटाची टांगती तलवार

ऑटो-टॅक्सी संघटनांनी सांगितल्याप्रमाणे मुंबईत निर्माण होत असलेला सीएनजीचा तुटवडा या परिस्थितीवर अधिक लक्ष ठेवले जात असून येणारा आठवडा महत्त्वाच ठरणार आहे तर दुसऱ्याबाजूला गंभीर गोष्ट समोर आली की पेट्रोल आणि डिझेलचा साठा सुमारे 45 ते 50 दिवस पूरेल असा दावा पेट्रोल पंप चालकांनी केलेला आहे.

advertisement

सध्याच ऑटो-रिक्षा तसेच टॅक्सी संघटनांच्या मते सीएनजी पुरवठा सुरळीत आहे मात्र येत्या काही काळात वाहनांमध्ये गॅस भरण्याचा दाब हा खुप कमी होण्याची शक्यता आहे. साधारण पाहिले तर दररोज 10 लाख किलो सीएनजीची गरज भासते.

12 लाख वाहनांसमोर मोठे आव्हान

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कन्यादानाला तयार, पण अन्नदानाचं काय? इराण युद्धामुळं पुण्यातली लग्नं रद्द होण्याची वेळ, काय घडतंय? Video
सर्व पहा

भविष्यात होणारी अडचण लक्षात घेता काही ऑटो आणि टॅक्सी चालकांनी सीएनजी पंपांवर मोठ्या प्रमाणात रांगा लावण्यासही सुरुवात केलेली आहे. काही पंपांना पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी 100 टक्के क्षमतेने गॅस पुरवठा केला जात नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या महानगर गॅसच्या कार्यक्षेत्रात सुमारे बारा लाख सीएनची कार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : पेट्रोल-डिझेल 50 दिवस पुरेल, पण सीएनजीचे काय? मुंबईकर चिंतेत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल