TRENDING:

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी!, आता 15 डब्यांच्या लोकल धावणार, नेमका काय बदल?

Last Updated:

mumbai local - पश्चिम रेल्वेने दसऱ्याचा शुभमुहूर्त साधून शनिवारपासून लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या वेळापत्रकानुसार पश्चिम रेल्वेवर 15 डब्यांच्या 10 लोकल फेऱ्या वाढविण्यात येणार असल्याने एकूण 209 फेऱ्या चालवण्यात येणार आहे. याचबाबत लोकल18 च्या टीमचा हा विशेष आढावा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रतिकेश पाटील, प्रतिनिधी
मुंबई लोकल (फाईल फोटो)
मुंबई लोकल (फाईल फोटो)
advertisement

मुंबई : पश्चिम रेल्वेने दसऱ्याचा शुभमुहूर्त साधून शनिवारपासून लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या वेळापत्रकानुसार पश्चिम रेल्वेवर 15 डब्यांच्या 10 लोकल फेऱ्या वाढविण्यात येणार असल्याने एकूण 209 फेऱ्या चालवण्यात येणार आहे. याचबाबत लोकल18 च्या टीमचा हा विशेष आढावा.

दसऱ्याच्या मुहूर्तावर पश्चिम रेल्वेवर 12 नव्या उपनगरी रेल्वेगाड्या सुरू करण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवरील उपनगरी रेल्वेगाड्यांच्या फेऱ्यांची संख्या 1394 वरून 1406 इतकी होईल. त्यामुळे रेल्वेप्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन 12 डब्यांच्या लोकलचे 15 डब्यांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. डहाणू आणि विरार विभागातील प्रवाशांना विस्तारित केलेल्या उपनगरी रेल्वेगाड्यांचा फायदा होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या  अधिकाऱ्याकडून देण्यात आली.

advertisement

याचबरोबर नव्या उपनगरी रेल्वेगाड्यांच्या 6 फेऱ्यांचा विस्तार केला आहे. यात 3 अप आणि 3 डाऊन दिशेकडील उपनगरी रेल्वेगाड्यांच्या फेऱ्यांचा समावेश आहे. अप दिशेने बोरिवली चर्चगेट जलद लोकल बोरिवलीहून सकाळी 10.36 वाजता सुटते. तर, ही लोकल भाईंदरहून सकाळी 10.21 वाजता सुटून चर्चगेटला सकाळी 11.24 वाजता पोहोचेल. विरार अंधेरी जलद लोकल दादरपर्यंत विस्तारित केली आहे. विरारहून दुपारी 3.36 वाजता सुटेल आणि दुपारी 4.41 वाजता दादरला पोहोचेल.

advertisement

वसई रोडवरून रात्री 8.41 वाजता सुटणारी चर्चगेट जलद वातानुकूलित लोकल आता विरारहून रात्री 8.29 वाजता सुटेल आणि रात्री 9.53 वाजता चर्चगेटला पोहोचेल. चर्चगेटहून सकाळी 9.19 वाजता सुटणारी चर्चगेट बोरिवली जलद लोकल विरारपर्यंत विस्तारित केली आहे. ही लोकल सकाळी 10.39 वाजता विरारला पोहोचेल.

दुपारी 4.37 वाजता अंधेरी-विरार जलद लोकल दादरवरून दुपारी 4.48 वाजता सुटेल. तर, विरारला सायंकाळी 5.44 वाजता पोहचेल. चर्चगेटहून सायंकाळी 7 वाजता सुटणारी चर्चगेट-वसई रोड जलद वातानुकूलित लोकल विरारपर्यंत विस्तारित केली असून ही लोकल विरारला रात्री 8.22 वाजता पोहोचेल.

advertisement

लाडकी बहीण योजनेच्या अर्जासाठी मुदतवाढ, ही आहे नवीन तारीख अन् अट

नेमका बदल काय -

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

पश्चिम रेल्वेच्या नवीन वेळापत्रकात अप दिशेने 6 नव्या लोकल सेवांचा समावेश असेल. त्यात विरार चर्चगेट जलद एक लोकल फेरी, डहाणू रोड-विरार दरम्यान 2 धीम्या लोकल फेऱ्या आणि अंधेरी, गोरेगाव आणि बोरिवली चर्चगेट दरम्यान प्रत्येकी एका धीम्या लोकला फेरीचा समावेश आहे. डाऊन दिशेने जाणाऱ्या चर्चगेट नालासोपारा दरम्यान 1 जलद लोकल फेरी असेल. तसेच चर्चगेट गोरेगावला जोडणाऱ्या 2 धीम्या फेऱ्या आणि चर्चगेट अंधेरी दरम्यान 1 धीमी फेरी आणि विरार-डहाणू रोड दरम्यान 2 लोकल फेऱ्या असतील.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी!, आता 15 डब्यांच्या लोकल धावणार, नेमका काय बदल?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल