लाडकी बहीण योजनेच्या अर्जासाठी मुदतवाढ, ही आहे नवीन तारीख अन् अट

Last Updated:

ladki bahin yojana last date - राज्य सरकारने ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या अंतर्गत महिलांना 500 पंधराशे रुपये लाभ देण्यात येतो. आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र महिलांना साडेसात हजार रुपयांपर्यंत लाभ मिळाला आहे.

+
लाडकी

लाडकी बहीण योजना मुदतवाढ

नारायण काळे, प्रतिनिधी
जालना - राज्यभरातील महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे.  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे. आता 15 ऑक्टोबरपर्यंत पात्र महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात. यामुळे ज्या लाडक्या बहिणींचा फॉर्म भरायचा बाकी होता. त्यांना आता लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरता येणार आहे.
राज्य सरकारने ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या अंतर्गत महिलांना 500 पंधराशे रुपये लाभ देण्यात येतो. आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र महिलांना साडेसात हजार रुपयांपर्यंत लाभ मिळाला आहे.
advertisement
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत ग्रामीण भागापासून शहरापर्यंत मोठा प्रतिसाद मिळाला होता. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. त्यामुळे सरकारने अ‍ॅप आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात केली होती. परंतु आता जी मुदतवाढ दिली आहे, ती ऑनलाईन पद्धतीने किंवा अ‍ॅपने अर्ज करता येणार नाही. या योजनेसाठी आता फक्त अंगणवाडी सेविकामार्फतच अर्ज करावा लागणार आहे.
advertisement
लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्यासाठी आधी 1 जुलै, 2024 ते 15 जुलै, 2024 पर्यंत मुदत दिली होती. परंतु त्यानंतर ती वाढवून 31 ऑगस्ट केली. त्यानंतर पुन्हा एकदा मुदत वाढवून 30 सप्टेंबर केली. आता तिसऱ्यांदा मुदत वाढवते 15 ऑक्टोबर करण्यात आली आहे.
advertisement
योजनेच्या लाभासाठी या आहेत अटी -
अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला अर्ज करु शकतील. आधी लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष होता. नवीन बदलानुसार तो 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
advertisement
योजनेसाठी कोणती कागदपत्रे हवीत -
आधार कार्डअधिवात/जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, अर्जदाराने हमीपत्र, बँक पासबुक, अर्जदाराचा फोटो
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
लाडकी बहीण योजनेच्या अर्जासाठी मुदतवाढ, ही आहे नवीन तारीख अन् अट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement