amitabh bachchan birthday : सलग 9 वर्षांपासून इंदूरवरुन मुंबईत येतोय बिगबींचा चाहता, म्हणाला...
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Nikita Tiwari
Last Updated:
amitabh bachhan birthday special - दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त फक्त विलेपार्ले मुंबई नाही तर देशभरातून त्यांचे चाहते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येथे हजेरी लावतात. यावर्षीही त्यांच्या चाहत्यांनी याठिकाणी मोठी गर्दी केली आहे. याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
निकिता तिवारी, प्रतिनिधी
मुंबई - हिंदी सिनेसृष्टीचे बादशाह म्हणजेच अमिताभ बच्चन यांचा आज जन्मदिवस आहे. ते आज 82 वर्षांचे झाले आहेत. मुंबईमधील विलेपार्ले येथे जुहू परिसरात त्यांचा जलसा या बंगला परिसरात या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याठिकाणी चाहत्यांची गर्दी झाली आहे.
दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त फक्त विलेपार्ले मुंबई नाही तर देशभरातून त्यांचे चाहते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येथे हजेरी लावतात. यावर्षीही त्यांच्या चाहत्यांनी याठिकाणी मोठी गर्दी केली आहे. याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
advertisement
अमिताभ बच्चन यांचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. कोणी त्यांचे सिनेमे अनेकदा पाहिले आहेत, तर कोणी त्यांच्या फोटोंचे कलेक्शन केले आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे चाहते फक्त त्यांच्या एका झलकसाठी वाढदिवसा निमित्त त्यांना आवर्जून भेट देतात. आजही याठिकाणी मोठी गर्दी झाली आहे.
advertisement
भारतभरातून आलेल्या चाहत्यांनी दिल्या या प्रतिक्रिया -
advertisement
सुनील गुप्ता हे भांडूपवरुन आलेले चाहते म्हणाले की, मी 12 वाजता आलो आहे आणि आता 5 वाचेपर्यंत उभा आहे. तसेच उल्हासनगरवरुन 64 वर्षीय चाहतेही आले. ते म्हणाले की, मी प्रत्येक वर्षी येतो. पण साहेब भेट नाहीत. तसेच एक चाहते सोलापूरवरुन आले. ते म्हणाले की, साहेबांच्या 82 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी आलो. इतकेच नव्हे तर एक चाहते नरेंद्र केसरानी हे मध्यप्रदेशातील इंदूरवरुन आले. ते म्हणाले की, मी सलग 9 वर्षांपासून याठिकाणी येत आहे. तर भावनगर गुजरात येथून आलेले चाहते म्हणाले की, आमचे सर (अमिताभ बच्चन) हे गुजरातचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. गुजरातचा सुंगध आहेत. मी त्यांना 40 वेळा भेटलेलो आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
advertisement
हिंदी सिनेसृष्टीमध्ये 50 पेक्षा जास्त वर्ष गाजवल्यानंतर बिग बींनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज जरी त्यांचे वय झाले असले तरी त्याच्या अनेक अदा चाहत्यांना भावतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 11, 2024 6:20 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
amitabh bachchan birthday : सलग 9 वर्षांपासून इंदूरवरुन मुंबईत येतोय बिगबींचा चाहता, म्हणाला...

