advertisement

Iphone युजर्ससाठी Red Alert! फोन सुरक्षित ठेवायचा असेल तर लगेच करा हे एक काम, Apple चा इशारा

Last Updated:

ॲपलने नुकतीच एक आपत्कालीन चेतावणी जारी केली असून, सर्व आयफोन वापरकर्त्यांना तातडीने एक पाऊल उचलण्यास सांगितले आहे. तुमचे खासगी आयुष्य हॅकर्सच्या हातात पडण्यापासून वाचवायचे असेल, तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Iphone
Iphone
मुंबई : आजच्या काळात आपला स्मार्टफोन हा केवळ संवादाचे साधन राहिलेला नाही, तर ते आपल्या खासगी आयुष्याचं एक डिजिटल कपाट झालं आहे. बँकिंग डिटेल्स, फॅमिली फोटो, महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आणि पासवर्ड्स... हे सगळं एका क्लिकवर उपलब्ध असतं. म्हणूनच जेव्हा जगातील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या 'Apple' कडून एखादा इशारा येतो, तेव्हा जगभरातील करोडो युजर्सचे धाबे दणाणतात. जर तुमच्या हातात आयफोन (iPhone) असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी कोणत्याही 'रेड अलर्ट'पेक्षा कमी नाही.
ॲपलने नुकतीच एक आपत्कालीन चेतावणी जारी केली असून, सर्व आयफोन वापरकर्त्यांना तातडीने एक पाऊल उचलण्यास सांगितले आहे. तुमचे खासगी आयुष्य हॅकर्सच्या हातात पडण्यापासून वाचवायचे असेल, तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.
नेमका धोका काय?
फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, ॲपलने आयफोन युजर्ससाठी iOS 26.3 हा नवा अपडेट जारी केला आहे. हा कोणताही सामान्य अपडेट नाही, तर एक गंभीर सुरक्षा कवच आहे. ॲपलने स्पष्ट केले आहे की, जुन्या सॉफ्टवेअरमध्ये 39 अशा सुरक्षा त्रुटी (Security Vulnerabilities) आढळल्या आहेत, ज्यांचा फायदा घेऊन हॅकर्स तुमच्या फोनवर पूर्ण ताबा मिळवू शकतात.
advertisement
धक्कादायक बाब म्हणजे, यातील एका त्रुटीचा वापर करून हॅकर्सनी आधीच काही युजर्सवर सायबर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. म्हणजेच, जर तुम्ही अपडेट करण्यात उशीर केला, तर तुमचा डेटा चोरीला जाण्याची शक्यता अधिक आहे.
'CVE-2026-20700' : हा बग का आहे खतरनाक?
ॲपलच्या तांत्रिक टीमने दिलेल्या माहितीनुसार, फोनमधील dyld (Dynamic Link Editor) नावाच्या घटकामध्ये एक मोठी त्रुटी होती. या बगला 'CVE-2026-20700' असे नाव देण्यात आले आहे. या त्रुटीचा फायदा घेऊन हॅकर्स तुमच्या आयफोनमध्ये स्वतःचा कोड टाकू शकतात.
advertisement
तज्ज्ञांच्या मते, या बगचा वापर करून पत्रकार, राजकारणी आणि बड्या उद्योगपतींची अत्यंत अचूकपणे जासूसी केली जात होती. हे एका मोठ्या 'स्पायवेअर' हल्ल्याचे लक्षण मानले जात आहे.
तुमच्याकडे 'हे' मॉडेल्स आहेत का?
जर तुमच्याकडे खालीलपैकी कोणतेही डिव्हाइस असेल, तर तुम्हाला त्वरित अपडेट करणे गरजेचे आहे
iPhone: आयफोन 11 (iPhone 11) आणि त्यानंतरचे सर्व नवीन मॉडेल्स.
advertisement
iPad: आयपॅड प्रो, आयपॅड एअर आणि आयपॅड मिनी (5 वी जनरेशन) नंतरचे सर्व मॉडेल्स.
तुमचा आयफोन सुरक्षित कसा करायचा? (स्टेप-बाय-स्टेप गाइड)
तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी अजिबात वेळ न घालवता खालील स्टेप्स फॉलो करा:
1. तुमच्या आयफोनच्या Settings मध्ये जा.
2. तिथे General या पर्यायावर क्लिक करा.
3. आता Software Update वर टॅप करा.
advertisement
4. तुम्हाला तिथे iOS 26.3 अपडेट दिसेल, त्यावर Download and Install वर क्लिक करा.
(टीप: अपडेट करण्यापूर्वी तुमचा फोन वाय-फायशी कनेक्ट करा आणि बॅटरी 50% पेक्षा जास्त असल्याची खात्री करा.)
तंत्रज्ञानाच्या या जगात सुरक्षा हीच सर्वात मोठी प्राथमिकता आहे. ॲपलसारखी कंपनी जेव्हा स्वतःहून 'इमर्जन्सी' चेतावणी देते, तेव्हा परिस्थिती गंभीर असते हे उघड आहे. त्यामुळे आळस करू नका, अवघ्या काही मिनिटांचा हा अपडेट तुमचा बँक बॅलन्स आणि खासगी माहिती सुरक्षित ठेवू शकतो.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Iphone युजर्ससाठी Red Alert! फोन सुरक्षित ठेवायचा असेल तर लगेच करा हे एक काम, Apple चा इशारा
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement